Soybean Seeds Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market: जागतिक सोयाबीन पुरवठा यंदाही जास्तच राहणार

Soybean Market Update : आंतरराष्ट्रीय पातळीवर २०२३-२४ च्या हंगामात सोयाबीनचा पुरवठा विक्रमी पातळीवर पोचण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Pune News : आंतरराष्ट्रीय पातळीवर २०२३-२४ च्या हंगामात सोयाबीनचा पुरवठा विक्रमी पातळीवर पोचण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे सोयाबीनचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या चीनची सोयाबीनची मागणी कमी राहण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक बाजारात सोयाबीन दरावर दबाव राहू शकतो, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने व्यक्त केला आहे.

युएसडीएने आपल्या जागतिक तेलबिया मार्केट आणि ट्रेड या अहवालात सोयाबीनची स्थिती स्पष्ट केली. युएसडीएने म्हटले आहे की, २०२३-२४ च्या हंगामात अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे.

मात्र ब्राझीलमध्ये उत्पादनातील वाढ आणि युक्रेनमधील उत्पादन पूर्वपातळीवर पोचण्याची शक्यता यामुळे यंदा जागतिक सोयाबीन पुरवठा विक्रमी पातळीवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे, असे युएसडीएने स्पष्ट केले.

दुसरीकडे चीनमध्ये आर्थिक अडचणी आहेत. त्यामुळे जगातील महत्वाच्या सोयाबीन आयादार चीन, इजिप्त, पाकिस्तान आणि इतर आयातदार देशांमधून सोयाबीनला मागणी कमी राहण्याचा अंदाज आहे. यामुळे यंदा जागतिक बाजारात सोयाबीनचे भाव दबावात राहण्याचा अंदाज आहे, असे युएसडीएने म्हटले आहे.

अमेरिकेतून यंदा सोयाबीन निर्यात कमी राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेची निर्यात यंदा ३४ लाख टनांनी कमी राहण्याची शक्यता आहे. तर अमेरिकेतील सोयाबीनचा स्टाॅक १४ लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज आहे.

तर जैवइंधनात सोयाबीनचा वापर वाढण्याचा अंदाज असल्याने सोयाबीनचे गाळप काहीसे कमी राहण्याची शक्यता आहे. यंदाही जागतिक बाजारात अमेरिकेचे सोयाबीन ब्राझीलच्या तुलनेत कमीच येणार आहे.

यंदाही अमेरिकेतून सोयाबीन निर्यात कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ब्राझीलच्या सोयाबीनला मागणी वाढेल. परिणामी पुढील हंगामात ब्राझीलच्या सोयाबीन आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला भाव मिळण्याचा अंदाज आहे. चालू महिन्यात जागतिक बाजारात सोयाबीनचा व्यापार कमी झाला. इजिप्त, मेक्सिको या देशांनी आयात कमी केली.

दक्षिण अमेरिकेला फायदा

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काहीशी वाढ झाली. सोयाबीनच्या भावात वाढीचा ट्रेंड आहे. सोयाबीन दरात झालेली वाढ ही मुख्यता अमेरिकेत असलेला कमी पावसामुळे आहे. अमेरिकेतील चांगल्या स्थितीतील सोयाबीन पीक कमी होत आहे. तर दुसरीकडे ब्राझील आणि अर्जेंटीनात एल निनोमुळे सोयाबीन उत्पादनात चांगली वाढ होण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT