Agrowon  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast: आल्याचे भाव दबावात; हळद, कांदा, कापूस तसेच काय आहेत आजचे सोयाबीन भाव?

Daily Commodity Rates: आज आपण आले, हळद, कांदा, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

आल्याचे आवक वाढली

आल्याची काढणी सुरु असल्याने बाजारातील आल्याची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बाजारात आल्याचे भाव दबावात आले आहेत. यंदा आल्याचे उत्पादन चांगले असल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. बाजारातील आवकही चांगली आहे. त्याचा दबाव आल्याच्या भावावर आला. सध्या बाजारात आल्याला प्रतिक्विंटल २ हजार ते ३ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. आल्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आल्याच्या भावावरील दबाव कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

हळदीचे दर स्थिर

देशातील बाजारात हळदीची आवक वाढत आहे. त्यामुळे दरपातळीही दबावात आली आहे. तेलंगणाच्या अनेक बाजारात हळदीचे भाव १० हजारांच्या खाली आले आहेत. तर महाराष्ट्रात हळदीचा भाव १० हजार ते ११ हजारांच्या दरम्यान दिसत आहे. हळदीला सध्या मागणीही चांगली आहे. राज्यातील हळदीची आवक यापुढील काळात वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हळदीच्या दरावर काहीसा दबाव येऊ शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांदा दबावात

बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. बाजरात सध्या लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक दिसत आहे. तसेच होळीचा सण आणि मार्चएन्डमुळे बाजारातील आवक चांगली दिसत आहे. मात्र त्याचा दबाव कांदा दरावर येत आहे. कांद्याचा भाव मागील दोन आठवड्यांमध्ये क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी कमी झाला. सध्या कांद्याला सरासरी ११०० ते १३०० रुपयांचा भाव मिळत आहे. कांद्याची आवक महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कांदा दरावर दबाव राहील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीन दबावातच

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात आज दुपारपर्यंत काहीशी नरमाई आली होती. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १०.११ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड ३०० डाॅलर प्रतिटनांपर्यंत कमी झाले होते. देशात प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ४ हजार १०० ते ४ हजार २५० रुपयांच्या दरम्यान स्थिर होते. तर बाजार समित्यांमध्येही सोयाबीनला ३ हजार ८०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीन भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या दरात काहीशी सुधारणा

कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. देशात आजही कापसाच्या भावात काहीशी सुधारणा काही बाजारात दिसली. कापसाचा सरासरी भाव आता ७ हजारांच्या पुढे गेल्याचे दिसते. कापसाला आज ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान मिळाला. बाजारातील कापसाची आवक आजही ८० हजार गाठींच्या दरम्यान होती. देशातील कापूसाची आवक मार्चनंतर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT