Mangos Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Season: गावरान आंब्याचा हंगाम लवकर सुरू

Heatwave Impact on Mango: हवामान बदलाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या कोकण हापूसचा हंगाम यंदा लवकर संपत असून, त्या मागोमाग सुरू होणारा गावरान आंब्याचा हंगाम देखील १५ ते २० दिवस अगोदरच लवकर सुरू झाला आहे.

गणेश कोरे

Pune News: हवामान बदलाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या कोकण हापूसचा हंगाम यंदा लवकर संपत असून, त्या मागोमाग सुरू होणारा गावरान आंब्याचा हंगाम देखील १५ ते २० दिवस अगोदरच लवकर सुरू झाला आहे. वाढत्या उष्म्यामुळे गावरान आंब्याचा हंगाम सुरू झाल्याचे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितले.

पुणे आणि मुंबई बाजार समितीतील कोकण हापूसचा हंगाम संपत आला आहे. आता पुणे जिल्ह्यातील पश्‍चिम घाट परिसरातील असलेल्या मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव या तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर गावरान आंब्यांच्या विविध वाणांची मोठ्या प्रमाणावर लागवड आहे.

यामधील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या डोंगरी भागातील आंब्याची पुणे बाजार समितीमध्ये आवक होत असते. तर जुन्नर aखेड, आंबेगाव तालुक्यांतील आंब्याची मुंबई बाजार समितीमध्ये आवक होत असते.

पुणे बाजार समितीमधील गावरान आंब्याचे प्रमुख आडतदार तात्या कोंडे म्हणाले, की मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांतून गावरान आंब्याची तुरळक आवक सुरू झाली आहे. दर वर्षी साधारण मे अखेर सुरू होणारी आवक यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली आहे. यामुळे जूनच्या मध्यावरच हंगाम आटोपला जाईल अशी परिस्थिती आहे.

गावरान आंब्याचे उत्पादक शेतकरी रवींद्र पानसरे (रा. काले, ता. जुन्नर) म्हणाले, ‘‘दर वर्षी वाशी बाजार समितीमध्ये जुन्नर आंब्याचा हंगाम असतो. हा हंगाम साधारण १५ मे नंतर सुरू होतो. मात्र या वर्षी वाढत्या उन्हाळ्यामुळे आंबा लवकर पाडाला लागला. दोन दिवसांपूर्वी आमच्या बागेतील ५० बॉक्स आंबा वाशी बाजारात दाखल झाला आहे. सध्या ५०० रुपये डझन असा दर मिळत आहे. हा हंगाम जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहील असा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT