Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Export: अकोल्यातून २० टन केळी इराणला रवाना

Akola Banana Market: मंगळवारी (ता. ८) तेल्हारा तालुक्यातील हिंगणी येथील शेतकऱ्याची २० टन वजनाची गाडी निर्यातदाराने इराणसाठी रवाना केली.

 गोपाल हागे

Akola News: स्थानिक बाजारात दर्जेदार केळीला भाव मिळत नसल्याने संघर्ष करीत असलेल्या शेतकऱ्यांनी आता निर्यातदारांच्या माध्यमातून आपला माल विदेशात पाठवणे सुरू केले आहे. मंगळवारी (ता. ८) तेल्हारा तालुक्यातील हिंगणी येथील शेतकऱ्याची २० टन वजनाची गाडी निर्यातदाराने इराणसाठी रवाना केली.

अकोला जिल्ह्यात दर्जेदार केळी पिकवूनही स्थानिक व्यापारी दर पाडून खरेदी करतात. गेल्या आठवड्यात केळी उत्पादकांनी बोर्डाच्या दरांसाठी संबंधितांसमवेत चर्चाही घडवून आणली. आता त्यापुढे पाऊल टाकत एका निर्यातदार कंपनीच्या माध्यमातून आपल्या केळीची विदेशात विक्री सुरू केली.

मंगळवारी (ता. ८) पहिल्या गाडीची रवानगी झाली यानिमित्ताने केळी उत्पादकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम झाला. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, तालुका कृषी अधिकारी श्री. बुरांडे, मंडळ कृषी अधिकारी गौरव राऊत, केळी उत्पादक शेतकरी संघाचे राज्य समन्वयक सचिन कोरडे, जिल्हाध्यक्ष अनंता पाटील इंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष रौंदळे, केळी निर्यात करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी अजिंक्य ताकीक, रोहित मोहिते, सागर जाधव, दीपक मांगुले व हनुमंत खबाले उपस्थित होते.

यावेळी श्री. किरवे व सचिन कोरडे यांनी शेतकऱ्यांना केळीचा दर्जा, पॅकेजिंग, निर्यात प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केले. शेतकरी शंकर अनंतराव कोरडे यांनी उत्पादित केलेल्या केळीची इराण देशात यशस्वी निर्यात होत असल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी गणेश कोरडे, दीपक कोरडे, सुधाकर कोरडे, पप्पू नराजे, रामा जोध, सचिन जोध, गोटू कोरडे, यश नराजे, रमेश नराजे, दीपक जोध, मंगेश कोरडे, वैभव कोरडे, उमेश कोरडे, गोपाल राऊत, अंकुश दांदळे, वैभव लाहोळे, शैलेश विखे, स्वप्नील महल्ले यांची उपस्थिती होती.

दर्जानुसार १८०० रुपयांपर्यंत दर मिळण्याचा विश्‍वास

संबंधित निर्यातदारांनी मंगळवारी (ता. ८) पहिली गाडी भरली. आता दररोज या भागातून केळीच्या किमान दोन गाड्या इराणला पाठवण्याच्या उद्देशाने भरल्या जाणार आहेत. स्थानिक भागातील केळी निर्यात होऊ लागल्याने दर्जानुसार कमाल १८०० रुपयांपर्यंत दर मिळतील, असा विश्वास श्री. कोरडे यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT