Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market : बेदाणा हंगामाला सुरुवात! सांगली बाजारात ३० टन आवक, दर १८० ते २२५ रुपये

Bedana Rate : नव्या बेदाण्यास प्रति किलो १८० ते २२५ रुपये असा दर मिळाला. बेदाण्याचे दर १४० ते २१५ रुपये असा दर आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील नव्या बेदाणा सौद्याला प्रारंभ शुक्रवारी (ता. ३१) झाला. या वेळी बेदाण्याची ३० टन आवक झाली असून, त्यापैकी नवीन बेदाणा १० टन असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

नव्या बेदाण्यास प्रति किलो १८० ते २२५ रुपये असा दर मिळाला. बेदाण्याचे दर १४० ते २१५ रुपये असा दर आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून नवीन बेदाण्याची आवक वाढेल आणि बेदाण्याचे दरही वाढतील, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.

सध्या बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू झाला आहे. द्राक्षाची विक्री करून राहिलेल्या मालापासून बेदाणा तयार होऊ लागला आहे. त्यामुळे तयार झालेला बेदाणा विक्रीस आला आहे. बाजार समिती नवीन बेदाणा सौदा प्रारंभ बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. बेदाणा सौद्यात हिरव्या बेदाण्याला २२५, तर पिवळ्या बेदाण्यास १९१ रुपये प्रति किलो असा दर मिळाला. वास्तविक पाहता, गेल्या महिन्यात दीड महिन्यापासून बेदाण्याचे दर टिकून आहेत.

फेब्रुवारी मध्यापासून गती देणार

बेदाणा शेडची दुरुस्ती आणि डागडुजी पूर्ण झाली आहे. सध्या द्राक्ष विक्रीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे द्राक्ष विक्री करून झालेल्या मालापासून बेदाणा तयार करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत.

यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज आणि सांगोला तालुक्यातील जुनोनी भागांमध्ये बेदाणा तयार करण्यासाठी शेतकरी येऊ लागले आहेत. प्रामुख्याने थॉमसन या वाणाचा बेदाणा अधिक केला जातो. त्यानंतर तास-ए- गणेश, माणिक चमन, क्‍लोन टू, सोनाका या द्राक्षाच्या वाणापासून बेदाणा तयार केला जातो. त्यामुळे या वाणापासून बेदाणा तयार करण्यासाठी फेब्रुवारीच्या मध्यापासून लगबग सुरू होईल.

बेदाणा दर (प्रति किलो)

हिरवा बेदाणा : १८० ते २२५ रुपये

मध्यम बेदाणा : १३० ते १७० रुपये

काळा बेदाणा : ६९ ते १०० रुपये

पिवळा बेदाणा : १८० ते १९१ रुपये

यंदा द्राक्षाचे उत्पादन कमी असल्याने नवीन बेदाणा आवक कमी होईल. त्यामुळे बेदाण्याचे दर चांगले राहतील. शेतकऱ्यांनी बाजार समिती बेदाणा विक्रीसाठी घेऊन यावा.
- सुजय शिंदे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली
गेल्या महिना ते दीड महिन्यापासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. सध्या बाजारात नवीन आलेला बेदाण्याला प्रतवारीनुसार चांगले दर मिळाले आहेत. बाजारात येत्या पंधरवड्यात बेदाण्याची मागणी वाढेल.
- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT