Flower Producers Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Flower Market : फूल उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक

पुणे बाजार समितीमधील भाजीपाला विभागात फुले विक्री करण्यास बंदी असताना फूल उत्पादक शेतकऱ्याकडून फुलांचा व्यवहार करून त्यांच्या हिशोबपट्टीतून बेकायदा भराई, तोलाई वसुली करण्यात आल्याचा गैरप्रकार समोर आला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः पुणे बाजार समितीमधील भाजीपाला विभागात फुले विक्री (Flower Sellers) करण्यास बंदी असताना फूल उत्पादक (Flower Producers) शेतकऱ्याकडून फुलांचा व्यवहार करून त्यांच्या हिशोबपट्टीतून बेकायदा भराई, तोलाई वसुली करण्यात आल्याचा गैरप्रकार समोर आला आहे. विजयादशमीच्या दिवशी साताऱ्याच्या शेतकऱ्याकडून तरकारी विभागातील अडत्याने भराई आणि तोलाई वसूल केली आहे.

सातारा जिल्ह्यातून एका शेतकऱ्याने ४ ऑक्टोबर रोजी बाजार समितीमध्ये ७२४ किलो फुले विकण्यासाठी आणली होती. त्या शेतकऱ्याने बाजारातील एका अडत्याकडे ७२४ किलो झेंडूचा व्यवहार केला. फूल खरेदीनंतर अडत्याने गाडीमधील काही क्रेट रिकामे केले. त्यानंतर पावती करताना त्याने विशिष्ट हमालीची रक्कम नमूद केली.

तसेच, भराई व तोलाईचे पैसे वजा करून शिल्लक रक्कम शेतकऱ्‍याला दिली. यानिमित्ताने तरकारी विभागातील अडतदाराने अनावश्यक तोलाई आणि भराईद्वारे लूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही रक्कम सुमारे ७०० रुपये एवढी असल्याची शेतकऱ्याने सांगितले.

फुलांचा व्यवहार तरकारी विभागात होणे चुकीचे आहे. सणासुदीच्या काळात प्रत्येक शेतकऱ्‍याने या स्वरूपाचे धोरण अवलंबविल्यास बाजार आवारात विस्कळितपणा येईल. प्रशासनाने सणासुदीच्या काळात फूल बाजारातील अडतदारांसाठी तशी सोय करून देण्याची आवश्यकता आहे.

जेणेकरून शेतकरी फूल बाजारात फूल आणण्यास प्रवृत्त होतील. त्यांची फसवणूक होणार नाही. तसेच बाजार समितीला सेसद्वारे उत्पन्नही मिळेल.

- अरुण वीर, अध्यक्ष, अखिल पुणे फूल बाजार अडते असोसिएश.

या प्रकरणाची माहिती घेऊन संबंधितावर कारवाई केली जाईल.

- मधुकांत गरड, प्रशासक,

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT