Fish Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Fish Price: मासळीच्या दरात झपाट्याने वाढ! उन्हाळी पर्यटनामुळे मागणी वाढली

Sindhudurg Tourism Impact: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन हंगामाला वेग आल्याने मासळीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पापलेट १४०० रुपये, सुरमई ९०० ते १००० रुपये तर कोळंबी ७०० रुपयांवर पोहोचली आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन हंगामाला गती प्राप्त झाल्यामुळे मासळीच्या दरात देखील सुधारणा झाली आहे. पापलेटचा दर प्रति किलो १४०० तर सुरमई ९०० ते १००० रुपयांवर पोहोचला आहे. अन्य मासळीच्या दरात देखील काहीशी सुधारणा झाली आहे. पुढील दीड, दोन महिने मासळीचे दर कायम राहतील, अशी शक्यता आहे.

जिल्ह्यात पर्यटन हंगामाला गती प्राप्त झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांचा ओढा जिल्ह्यात वाढला आहे. पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात मासळीच्या दरात दरवर्षी सुधारणा होते. परंतु या वर्षी पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे.

त्यामुळे मासळीच्या दरात सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात सध्या पापलेट प्रतिकिलो १४०० रुपये, सुरमई ९०० ते १००० रुपये, बांगडा २०० रुपये, लहान कोळंबी ४०० ते ५००, मोठी कोळंबी ६०० ते ७००, सौंदळा ४०० रुपये, मोरी ६०० रुपये, मांदेली १०० ते २०० रुपये असे दर आहेत.

पर्यटन हंगाम मे अखेरीपर्यंत चालतो. १० एप्रिल ते २० मे या कालावधीत पर्यटकांची मोठी गर्दी जिल्ह्यात असते. या कालावधीत मासळीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या मासळी मिळण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे दरात सुधारणा झाली आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर पर्यटकांचा ओघ जिल्ह्यांमध्ये दरवर्षी वाढत असतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT