Tur Bajarbhav Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

MSP Procurement : हमीभाव केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ

तूर हंगाम सुरू झाला आहे. नवीन खरीप हंगामाचे येत्या काही महिन्यांत नियोजन सुरू होणार आहे.

Team Agrowon

Yavatmal MSP News : जिल्ह्यात तूर नोंदणी केंद्र (Tur Registration Center) सुरू झाले असले तरी शेतकऱ्यांनी केंद्राकडे पाठ फिरविली आहे. नाफेडचे (Nafed) केंद्र निश्‍चित झाली आहे. खासगीत तुरीला चांगले दर (Tur rate) असल्याने शेतकऱ्यांची खासगीत तूरविक्रीला पसंती असणार आहे.

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात तूर खरेदीबाबत अनेक घोळ सुरू आहेत. कधी बारदाना, तर कधी जागेचा प्रश्‍न दोन वर्षांपासून कायम आहे.

यंदा बारदाना, जागा व खरेदी सर्व बाबी अनुकूल आहेत. असे असले तरी यंदा खासगीत भाव चांगले असल्याने शेतकऱ्यांचा कल खासगीकडे जास्त आहे.

शासनाने यंदा हमीभाव केंद्र अ‍ॅक्टिव्ह केले आहे. असे असले तरी केंद्रांवर अजूनही शेतकरी पोहोचलेले नाहीत. यंदा ज्वारी हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली होती. तूरीबाबतही तसेच भूमिका शेतकऱ्यांची दिसत आहे.

कापसाचे भाव वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे अजूनही शेतकरी कापूस विकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. तुरीबाबतही तशीच भूमिका अनेक शेतकऱ्यांची आहे. येणाऱ्या काळात शेतमालाचे भाव वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेतमाल घरातच ठेवला आहे.

तुरीला यंदा चांगले दर

तूर हंगाम सुरू झाला आहे. नवीन खरीप हंगामाचे येत्या काही महिन्यांत नियोजन सुरू होणार आहे. अशास्थितीत तुरीचे भाव पाहता शेतकरी तूर बाजारात आणायची की नाही, अशा द्विधामनस्थितीत दिसून येत आहेत.

तुरीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे. काही शेतकऱ्यांनी सध्याचे दर पाहता तूरविक्री सुरू केली असून, काही शेतकरी आणखी काही दिवस प्रतीक्षा करण्याच्या मानसिकतेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Account Verification: शेतकऱ्यांच्या खात्यांची कर्जमाफीसाठी तपासणी

Monsoon In Kerala: आनंदघन केरळात

Onion Procurement Rules: कांदा खरेदीचे निकष शिथिल

Vidarbha Rain Forecast: विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Dahivadi Heavy Rain: दहिवडी परिसराला पावसाने झोडपले

SCROLL FOR NEXT