Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market : शेतकऱ्यांनी दराअभावी बेदाणा विक्री थांबविली

Bedana Rate : यंदाच्या नवीन बेदाण्याची आवक बाजारात होत असून उठावही चांगला होत आहे. मात्र बेदाण्याला दर अपेक्षित मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : यंदाच्या नवीन बेदाण्याची आवक बाजारात होत असून उठावही चांगला होत आहे. मात्र बेदाण्याला दर अपेक्षित मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या बेदाण्याला सरासरी ११० ते १७० रुपये असा दर आहे. उत्पादन खर्च वाढल्याने या दराने बेदाणा विक्री करून कसे परवडणार, असा प्रश्‍न बेदाणा उत्पादकांना पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा विक्री थांबविली आहे.

यंदा द्राक्ष हंगामाच्या वेळी अवकाळी पाऊस झाला. त्यातच करपाजन्य आणि बुरशीजन्य रोगामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा उत्पादनासाठी पुढाकार घेतला नाही. त्यातच हंगामाच्या प्रारंभापासून बेदाण्याचे दर टिकून होते. गेल्या २० ते २५ दिवसांपासून बाजारात बेदाण्याची आवक वाढू लागली आहे.

सध्या सांगली, तासगाव आणि पंढरपूर या तिन्ही बाजार समित्यांत सौद्याला होळीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या १५ दिवसांपूर्वी तीन हजार टनांहून अधिक आवक होती. होळीनिमित्त खरेदी अंतिम टप्प्यात आली असल्याने गेल्या आठवड्यापासून बेदाण्याची आवक दोन हजार टन आहे.

दरम्यान, फेब्रुवारीत बेदाण्याला ११० ते १४० रुपये असा दर होता. होळीनिमित्त बेदाण्याला मागणी असल्याने दरात प्रति किलोस १५ ते २० रुपयांनी सुधारणा झाली होती. व्यापारी म्हणतात, ‘‘बेदाण्याला मागणी चांगली असून उठावही होत आहे. त्यामुळे गेल्या १५ ते २० दिवसांपूर्वी बेदाण्याच्या दरात प्रतिकिलोस १० ते १५ रुपयांनी वाढ झाली. सध्या बेदाण्याला १२० ते २३० रुपये असा दर आहे. बेदाण्याच्या दर्जानुसार प्रतिकिलोस २३० रुपये असा दर आहे.’’

दराबाबत संभ्रमावस्था

शेतकरी म्हणाले, की बाजार समितीत व्यापारी बेदाण्याला उच्चांकी दर जाहीर करतात. त्यामुळे शेतकरी बेदाणा विक्रीसाठी येतात, परंतु त्या ठिकाणी दर्जेदार म्हणजे एक नंबरचा बेदाणा हा कमी असतो. त्याला उच्चांकी दर मिळतो. बहुतांश मालाला दर कमी मिळतो. त्यामुळे नुकसान होते. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून जाहीर केलेल्या दरांबाबत संभ्रमावस्था आहे.

तासगाव बाजार समितीने दराबाबत सांगितले, की यंदाच्या नव्या बेदाण्याचे दर वाढले असून दर टिकून आहेत. परंतु बेदाण्याला प्रति किलोस मिळणारा २३० रुपये हा दर क्वचितच मिळत आहे. त्यामुळे सांगली, तासगाव, पंढरपूर या बाजार समित्यांत बेदाण्याची आवक कमी झाली आहे.

यंदा १० टन बेदाणा केला आहे. दर नसल्याने बेदाणा सौद्यालाही नेला नाही. बेदाणा प्रतिकिलो ११० रुपयाने विकून कसा परवडणार? सध्या विक्री करणार नाही.
- सुरेश पाटील, बेदाणा उत्पादक, आगळगाव, ता. कवठेमहांकाळ
यंदा १६ टन बेदाणा तयार केला आहे. त्यापैकी तीन टन माल विक्री केला. बेदाणा निर्मितीचा खर्च वाढला आहे. बाजारात दर वाढीची चिन्हे दिसत नाहीत. दरवाढीची प्रतीक्षा करत आहे.
- सुरेश कोडग, बेदाणा उत्पादक, आगळगाव, ता. कवठेमहांकाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT