Chana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana : हरभरा विक्रीचे चुकारे थकलेलेच

शासनाने ‘नाफेड’अंतर्गत शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या हरभऱ्याचे चुकारे अद्यापही अप्राप्त आहेत. शेतकरी सतत खरेदी केंद्रात चुकाऱ्यांसाठी चकरा मारीत आहेत.

टीम ॲग्रोवन

बोदवड, जि. जळगाव : शासनाने ‘नाफेड’अंतर्गत (NAFED) शेतकऱ्यांकडून खरेदी (Chana Procurement) केलेल्या हरभऱ्याचे चुकारे (Chana Payment) अद्यापही अप्राप्त आहेत. शेतकरी सतत खरेदी केंद्रात चुकाऱ्यांसाठी चकरा मारीत आहेत.

गेल्या मार्चपासून ही खरेदी सुरू होती. शेतकऱ्यांचे चुकारे एक महिन्याच्या आत यायला हवे, पण आता जुलैअखेरीसही शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नाही. शेतकरी आपल्या शेतात बियाणे, खते, फवारणी आदी कामे उधार अथवा व्याजाने पैसे घेऊन करीत आहेत, पण आपलेच पैसे शासनाकडून शेतकऱ्यांना मिळत नाहीत. महा एफपीसी, पुणे यांच्याकडे भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता आमचा पाठपुरावा ‘नाफेड’कडे सुरू आहे. त्याला किती वेळ लागेल व पेमेंट केव्हा येईल, हे आम्हाला माहिती नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

तसेच तुम्ही शेतीमाल जेथे विक्री केले, तेथील संस्थाचालकांना भेटा, असे पुण्यातील कार्यालयातून सांगितले जात आहे. मे महिन्यात विक्री केलेल्या हरभऱ्यासंबंधी पावती शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आमदार व खासदार यांनी केलेल्या पत्रव्यवहाराची कोणतीही दखल घेतलेली नाही. तालुक्यातील जय शिवनेरी फार्मर प्रोड्यूसर कंपनी, राजूर आणि आदिशक्ती मुक्ताई फार्मर प्रोड्यूसर कंपनी, घानखेड यांच्या ५५ ते ६० शेतकऱ्यांचे एक हजार १०० क्विंटल हरभरा विक्रीपोटी सुमारे ६० लाख रुपये रक्कम रखडली आहे. .

खरिपात निधीची गरज

शेतकऱ्यांना हरभरा खरेदीचे चुकारे शासनाकडून आतापर्यंत अदा करण्यात आलेले नाही. सध्या खरिपाचे दिवस आहेत. खते, मजुरीसाठी निधी हवा आहे. यातच पुढे उडीद, मूग खरेदी सुरू होईल. पण मागचेच चुकारे अप्राप्त आहेत. अशात शेतकरी शासनावर कसा विश्वास ठेवतील व शासनासोबत व्यवहार करतील, हादेखील मुद्दा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT