Onion Market Onion Market
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Onion Rate : खानदेशातील प्रमुख बाजारांत कांद्याची आवक वाढत आहे. दरात मात्र घसरण सुरू असल्याने उत्पादक अडचणीत येत आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशातील प्रमुख बाजारांत कांद्याची आवक वाढत आहे. दरात मात्र घसरण सुरू असल्याने उत्पादक अडचणीत येत आहेत. सध्या कांद्याला सरासरी दर १२०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

कमाल दर १५०० व किमान दर ७०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. कांद्याची आवक खानदेशात दररोज एकूण आठ हजार क्विंटल एवढी आहे. सर्वाधिक आवक धुळे जिल्ह्यात होत आहे. धुळे जिल्ह्यात पिंपळनेर (ता.साक्री) व धुळे बाजार समितीसह अन्य खासगी बाजारांत रोज साडेचार हजार क्विंटलपेक्षा अधिकची कांदा आवक आहे.

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक आवक चाळीसगाव येथील बाजारात होत आहे. चाळीसगावात रोज कांद्याची २००० ते १६०० क्विंटल आवक होत आहे. जळगाव येथेही रोज ७०० ते ९०० क्विंटल कांदा आवक होत आहे. तर यावल, चोपडा व अन्य भागातील बाजारांत मिळून रोज एक ते दीड हजार क्विंटल कांदा आवक होत आहे.

कांदा दरात मध्यंतरी सुधारणा झाली होती. परंतु मागील दोन दिवसांपासून सतत घसरण झाली आहे. कांदा दर कमाल १६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. परंतु त्यात मागील दोन दिवसांत घसरण झाली असून, कमाल दर १५१५ ते १५२५ असे विविध बाजारांत दर मिळाले आहेत.

आवक वाढल्याने दरात किंचित नरमाई आल्याचे सांगितले जात आहे. जळगाव येथील बाजारातही कमाल दर १५२५ रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. जळगाव येथे कांद्याची आवक छत्रपती संभाजीनगरातील सोयगाव, सिल्लोड भागांतून होत आहे. तसेच यावल, चोपडा, जळगाव, धुळे जिल्ह्यातूनही कांदा जळगावात येत आहे.

अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे. यातील कांद्याची विक्री दरात सुधारणेमुळे काही शेतकऱ्यांनी सुरू केली. एप्रिलमध्ये जळगाव, धुळे भागात कांद्याला सरासरी दर १२०० रुपये प्रतिक्विंटल, असा होता. या महिन्यात दरवाढ दिसली. परंतु त्यात चढ-उतार होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT