Gold Market Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Gold Rate : सोने, चांदीच्या दरात घसरण

Gold Sliver Market : पितृपक्ष सुरू झाल्याने सोने-चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Team Agrowon

Nagpur News : पितृपक्ष सुरू झाल्याने सोने-चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरात सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे. जुलैमध्ये सोन्याचे दर हे ६० हजार ५५० रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचले होते. गेल्या पाच दिवसांत सोने १५०० रुपयांनी घसरले असून, ५८ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहे.

शनिवारपासून (ता. ३०) पितृपक्ष सुरू झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. बहुतांश ग्राहका पितृपक्षात सोने खरेदी करीत नाहीत. त्यामुळे या काळात तुलनेत मागणी थोडी कमी होते. देशात सोन्याचा दर सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे. डॉलरच्या निर्देशांकातील वाढ आणि रोखे उत्पन्नात वाढ हे त्याचे कारण आहे.

येत्या काही दिवसांत किंवा दिवाळीपूर्वी सोने आणखी म्हणजे २ हजार ५०० रुपयांनी स्वस्त होऊ शकते. देशात सोन्याचा भाव ५५ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतरही सोन्याचा भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १० टक्क्यांनी अधिक असेल.

चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. चांदी प्रतिकिलो ७३ हजार ५०० रुपयांवरून ७१ हजार ९०० रुपयांवर आली आहे. गेल्या पाच दिवसांतच चांदी १६०० रुपयांनी घसरली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदीच्या दरात घसरण होत आहे.

सोने आणख स्वस्त होऊ शकते

दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. याचे कारण डॉलर निर्देशांकात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत व्याजदरात २५ आधार अंकांनी वाढ करू शकते.

त्याचा परिणाम डॉलर निर्देशांकावरही दिसून येणार आहे. डॉलरचा निर्देशांक ११० च्या पातळीवर पोहोचला, तर धनत्रयोदशीपर्यंत भारतातील सोन्याचा भाव सध्याच्या पातळीपेक्षा २५०० रुपयांनी कमी होऊ शकतो. याचा अर्थ सोन्याचा भाव भविष्यात ५५ हजार ५०० रुपयांपर्यंत येऊ शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनला मागणी वाढली; मेथीच्या दरात नरमाई, हळद-पपई स्थिर, लसूण भाव स्थिर

Paus Andaj: उद्यापासून पाऊस सुरु होणार; विदर्भ, कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता

Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत काही ठिकाणी तुरळक, हलका पाऊस

Herbal Plant Conservation : औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी पाऊल

Chia Seed : वाशीममधील चियासीड पोहोचले मुख्यमंत्र्यांपर्यंत

SCROLL FOR NEXT