Soybean, Chana Futures Ban Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Futures Ban Extension: सात शेतीमालाच्या वायदेबंदीला २ महिन्यांची मुदतवाढ ; शेतकरी, व्यापाऱ्यांची निराशा

Agriculture Commodity Market : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्पात सात शेतीमालाच्या वायद्यांवरील बंदी उठवेल, अशी अपेक्षा होती. मात्र ३१ जानेवारीलाच सेबीने वायदेबंदीला पुन्हा मुदतवाढ देत ३१ मार्च २०२५ पर्यंत केली.

अनिल जाधव

Pune News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्पात सात शेतीमालाच्या वायद्यांवरील बंदी उठवेल, अशी अपेक्षा होती. मात्र ३१ जानेवारीलाच सेबीने वायदेबंदीला पुन्हा मुदतवाढ देत ३१ मार्च २०२५ पर्यंत केली.

वायदेबंदीमुळे महागाई वाढत नाही शिवाय वायद्यांमुळे किंमत जोखिम व्यवस्थापन शक्य होते आणि भविष्यातील किमतीचा अंदाज बांधता येतो, असे अनेक अभ्यासातून सिध्द झाले. तरीही सरकारने वायदेबंदीला दोन महिन्यांची मुदतवाढ दिली.

सात शेतीमालाच्या वायद्यांवर डिसेंबर २०२१ मध्ये वायदेबंदी केली होती. यात सोयाबीनसह सोयातेल आणि सोयापेंड, मोहरीसह मोहरीतेल आणि मोहरीपेंड, कच्चे पाम तेल, हरभरा, गहू, बिगर बासमती तांदूळ तसेच मुगाचा समावेश आहे. नुकतेच सरकारने वायदेबंदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती.

वायदेबंदीची मुदत ३१ जानेवारी आणि केंद्राचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला होता. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्पात वायदेबंदी उठवल्याची घोषण करतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

त्यातच सोयाबीनसह बहुतांशी शेतीमालाचे भाव पडले आहेत. त्यामुळे वायदे सुरु करण्याची गरज आहे. सरकार एकीकडे मात्र बाजार सुधारणांच्या गप्पा करते आणि दुसरीकडे वायदे बाजार चालू देत नाही, अशी टिका शेतकरी करत आहेत.

विशेष म्हणजे सरकारने जे कारण देत वायदेबंदी केली होती, ती परिस्थिती बाजारात नाही. वायद्यांमुळे शेतीमालाच्या भावात अवास्तव भाववाढ होते, असे कारण देत वायदेबंदी केली होती. पण मागील तीन वर्षात वायदेबंदी असतानाही अनेक शेतीमालाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेही आणि पडलेही.

सध्या सोयाबीन, हरभरा, मूग, मोहरी या शेतीमालांचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे सरकार वायद्यांवरील बंदी उठवेल, अशी अपेक्षा होती. अर्थमंत्री अर्थसंकल्पात याविषयीची घोषणा करतील, अशी शक्यता होती.

कारण आर्थिक पाहणी अहवालातही शेतीमाल बाजारातील जोखीम कमी करण्यासाठी वायदेबाजारासारख्या साधनांचे अप्रत्यक्ष समर्थन करण्यात आले होते. मात्र सरकारने पुन्हा एकदा शेतकरी आणि व्यापाऱ्यांची निराशा केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT