Basmati Rice Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Basmati Rice Export : बिगर बासमती पांढऱ्या तांदळाची निर्यात खुली

Team Agrowon

New Delhi News : देशातील चांगले पाऊसमान आणि पिकाची चांगली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने तांदूळ निर्यातीवर निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. केंद्राने आता बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील बंदी मागे घेतली, तर अर्ध उकडलेल्या तांदळाच्या निर्यातीवरील शुल्क २० टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी केले.

मागील हंगामात देशात तांदळाचे उत्पादन घटले होते. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला होता. परिणामी सरकारने जुलै २०२३ मध्ये बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. तसेच ऑगस्ट २०२३ मध्ये अर्ध उकडलेला तांदूळ आणि मिलिंग न केलेला कच्चा तांदूळ निर्यातीवर २० टक्के शुल्क लागले होते.

पण सरकारने आता बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील बंदी मागे घेतली. तसेच अर्ध उकडलेल्या तांदळावरील निर्यातशुल्क २० टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी केले. तसेच तर ब्राऊन राईस आणि हातसडीच्या (पॉलिश न केलेला) तांदळावरील निर्यात शुल्क देखील कमी करून १० टक्के करण्यात आली आहे.

तर पांढऱ्या तांदळावरील निर्यात शुल्क शून्य करण्यात आला आहे. खरिपातील नवा माल काही दिवसांमध्ये बाजारात येईल. त्यातच निर्यातीवरील बंधने कायम होती. त्यामुळे निर्यातदारांसह शेतकऱ्यांमध्येही चिंता होती. मात्र नव्या हंगामातील तांदूळ बाजारात येण्याच्या ऐन तोंडावर सरकारने निर्यातीवर बंधने कमी करण्यास सुरुवात केली आहे.

सरकारने बिगर बासमती तांदळाची निर्यातबंदी मागे घेतली. हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे फक्त निर्यातदारांना उत्पन्न मिळणार नाही तर शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. खरिपातील पिकाला यामुळे भाव मिळू शकतो.
सूरज अगरवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, राईस व्हिला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weekly Weather : पावसाचे प्रमाण कमी-अधिक राहण्याची शक्यता

Grape Pruning : जुन्नरमधील द्राक्ष बागांच्या फळ छाटणीची कामे थांबली

Rain Alert : घाटमाथ्यावर जोरदार पाऊस

Seed Industry : बियाणे उद्योगावरील जाचक नियंत्रणे हटवा

Agriculture Department : ‘लाडक्या कंत्राटदारा’मुळे कृषी पुरस्कार्थी जेरीस

SCROLL FOR NEXT