Ethanol Industry Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ethanol Industry : इथेनॉल उद्योगासाठी तांदळाची मागणी वाढली

Rice Demand : यंदा इथेनॉल उद्योगाला निर्मितीसाठी तांदूळ पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने उद्योग अस्वस्थ बनला आहे. केंद्र सरकारने एफसीआय तांदळाचा जादापुरवठा करावा, अशी मागणी इथेनॉल उत्पादकांकडून होत आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : यंदा इथेनॉल उद्योगाला निर्मितीसाठी तांदूळ पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने उद्योग अस्वस्थ बनला आहे. केंद्र सरकारने एफसीआय तांदळाचा जादापुरवठा करावा, अशी मागणी इथेनॉल उत्पादकांकडून होत आहे. कच्च्या मालाअभावी इथेनॉल तयार करण्यास अडथळे येत असल्याने उद्योगाने पंतप्रधान कार्यालयाकडे धाव घेतली आहे.

केंद्राने इथेनॉल निर्मितीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. इथेनॉल निर्मितीचा प्रमुख भार ऊस, व मक्यावरच आहे. यंदा उद्योगाला मागणीच्या प्रमाणात मका मिळत नसल्याने धान्यावर आधारित उद्योगाला अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी उद्योगाने केली आहे.

ग्रेन इथेनाल मॅन्युफॅक्चरर्सने (गेमा) या बाबत पंतप्रधान कार्यालयाकडे धाव घेऊन तांदळाच्या उपलब्धतेची मागणी केली आहे. जोपर्यंत उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे मका पीक उपलब्ध होत नाही तोपर्यंत अतिरिक्त तांदळाचा पुरवठा करावा. धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरातही वाढ करावी, अशी प्रमुख मागणीही संघटनेची आहे.

सरकारने यंदा इथेनॉल निर्मितीसाठी सर्व बंधने उठविली आहेत. गेल्या वर्षी मक्याच्या लागवडीलाही प्रोत्साहन दिले होते. मका उत्पादक पट्ट्यात काही भागात लागवड वाढली असली, तरी अजूनही मक्याची आवक हव्या त्या प्रमाणात बाजारपेठेत होत नसल्याची स्थिती आहे. इथेनॉलसाठी मक्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. मक्याच्या उपलब्धतेअभावी धान्यावर आधारित इथेनॉल निर्मिती करणाऱ्या प्रकल्‍पांना मोठ्या अडचणी येत आहेत.

...अन्यथा इथेनॉल मिश्रण कार्यक्रमावर परिणाम

केंद्राने मर्यादित तांदूळ उपलब्ध करुन दिल्याने मका उपलब्‍ध होत नसेल तर इथेनॉल तयार करण्यासाठी दुसरे धान्य मिळत नसल्‍याने उद्योगाची कच्चा माल मिळविण्यासाठी धावाधाव होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उत्पादकांनी सरकारने या प्रश्‍नी गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. केंद्राने योग्य उपाययोजना न केल्‍यास अपेक्षित इथेनॉल तयार न झाल्याने त्याचा विपरीत परिणाम केंद्राच्या महत्त्वाकांक्षी इथेनॉल मिश्रण कार्यक्रमावर होऊ शकतो, अशी भीती ही उद्योगातून व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT