Ethanol Blending Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ethanol Blending : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण ११.६५ टक्क्यावर

Ethanol Production देशात पेट्रोलमध्ये १२ टक्के इथेनॉल मिश्रणाकडे वाटचाल सुरू आहे. तेल विपणन कंपन्यांना करार केलेल्या ५१४ कोटी लिटरपैकी २३३ कोटी लिटर इथेनॉलची प्राप्ती ३० एप्रिल अखेर झाली आहे.

Raj Chougule

Ethanol Production : देशात पेट्रोलमध्ये १२ टक्के इथेनॉल मिश्रणाकडे वाटचाल सुरू आहे. तेल विपणन कंपन्यांना करार केलेल्या ५१४ कोटी लिटरपैकी २३३ कोटी लिटर इथेनॉलची प्राप्ती ३० एप्रिल अखेर झाली आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत १० टक्के इथेनॉल मिश्रण होत होते. हे प्रमाण आता ११.६५ टक्के पर्यंत गेले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्‍या सूत्रांनी ही माहिती दिली. केंद्र शासनाने गेल्‍या दोन वर्षांपासून इथेनॉल निर्मितीवर जोर दिला आहे. सध्‍या इथेनॉल निर्मितीचा भार साखर उद्योगावर आहे.

साखर कारखान्यांनी जास्तीत जास्‍त प्रमाणात इथेनॉल निर्मितीकडे वळावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. फक्त साखर उद्योगावर अवलंबून न राहता केंद्राने अलीकडच्या काही महिन्यात धान्यावर आधारित प्रकल्प सुरू करण्‍यासाठीही चाचपणी केली. विशेष करून येथून पुढील काळात मक्या सारख्या पिकांपासून इथेनॉल निर्मिती व्‍हावी यासाठी विविध उपाययोजना आखल्‍या जात आहेत.

२०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्‍य करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून जोरदार हालचाली सुरू आहेत. सरकारने देशात इथेनॉलचे उत्पादन आणि वापरास प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम आणि उपाययोजना जाहीर केल्या आहेत, ज्यात इथेनॉल पुरवठा साखळीचा विस्तार, इथेनॉल प्रकल्पांची संख्या वाढवणे आणि फ्लेक्स-इंधन वाहनांचा वापर आदींचा समावेश आहे.

तेल उत्पादक कंपन्यांनी साखर-आधारित डिस्टिलरीजमधून ३७४ कोटी लिटर इथेनॉलची खरेदी करण्याबरोबर १४० कोटी लिटर धान्य-आधारित प्रकल्‍पांकडून खरेदी करण्याचा करार केला आहे. उसाच्या रसापासून बनवलेल्या इथेनॉलचे १३८ कोटी लिटर तर बी हेवी मोलॅसिस पासून २३० कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याचे करार झाले आहेत.

सध्या देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे येथून पुढे ऑक्टोबर पर्यंत इथेनॉल निर्मितीचा भर धान्यावरच असणार आहे. पुढील हंगाम सुरू होईपर्यंत केवळ मळीपासून इथेनॉल उत्पादन होवू शकणार आहे. इथेनॉल निर्मितीची गती कमी होवू नये या साठी केंद्राने धान्य आधारित प्रकल्पांना मान्यता देण्याचा वेगही वाढवला असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT