Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market Rate :  कापूस उत्पादन वाढल्याचे अंदाज; जागतिक उत्पादनाचाही अंदाज युएसडीएने वाढवला

Anil Jadhao 

Pune News : देशातील अनेक बाजारात कापसाचा कमाल भाव आता ८ हजारांच्या दरम्यान पोचला. तर सरासरी भावपातळी ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांवर पोचली. बाजारातील कापूस आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. तर युएडीएने आपल्या नुकत्याच जाहीर केलेल्या अंदाजात अनपेक्षित खुलासे केले. युएसडीएने भारताच्या कापूस उत्पादन आणि वापराच्या अंदाजात वाढ केलीच. शिवाय भारताच्या निर्यातीचा अंदाज चांगलाच वाढवला. 

देशातील बाजारात कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. आजही देशात ८० हजार गाठींपेक्षा कमी आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तर सध्या बाजारांमधील भाव टिकून आहे. खेडा खरेदीतही काही भागांमध्ये ७ हजार ८०० रुपयांपर्यंत भाव मिळतोय. पण अनेक ठिकाणी भावपातळी अद्यापही ७ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी आहे. सध्या कापसाचा भाव गुणवत्ता आणि आवकेप्रमाणे मिळतोय. अनेक बाजारात सध्या कापसाचा कमाल भाव ८ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. पण सरकारी भावपातळी ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. 

दुसरीकडे युएसडीएच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष होते. कारण कापसाचे भाव वाढत असताना युएसडीएने जास्त उत्पादन वाढीचा अंदाज दिल्यास बाजारावर त्याचे जास्त परिणाम उमटतील, अशी भीती होती. पण युएसडीएने जागतिक उत्पादन आणि वापराच्याही अंदाजात वाढ केली. भारताचा कापूस उत्पादनाचा अंदाजही ६ लाख गाठींनी वाढवला. तर वापराचा अंदाजही ४ लाख गाठींनी वाढवला. निर्यातीच्या अंदाजात मात्र चांगलीच वाढ केली. भारताची निर्यात यंदा २६ लाख गाठींवर पोचेल, असा अंदाज आता युएसडीएने व्यक्त केला. 

युएसडीएने जागतिक उत्पादनातही काहिशा वाढीचा अंदाज दिला. तर कापूस वापराचाही अंदाज वाढला. तर पुढील हंगामासाठी शिल्लक साठा कमी राहील, असेही युएसडीएने स्पष्ट केले. अमेरिकेच्या उत्पादन आणि शिल्लक साठ्याच्या अंदाजात कपात करण्यात आली. युएसडीएच्या या अंदाजाचा अमेरिकेच्या बाजारावर काहीसा परिणाम देखील झाला. आज बाजार सुरु झाला तेव्हा सुरुवातीच्या सत्रात मार्केट पडले होते. पण नंतर पुन्हा बाजारात सुधारणा होत गेली.

आज सायंकाळपर्यंत इंटकाॅन्टीनेंटल एक्सचेंजवर म्हणजेच अमेरिकेच्या बाजारात कापसाचे वायदे एक टक्क्याने वाढून ९६.२५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. म्हणजेच १७ हजार ५६० रुपये प्रतिक्विंटल भाव होतो. तर देशातील वायदे ६२ हजार ९०० रुपये प्रतिखंडी म्हणजेच १७ हजार ६०० रुपये होता. तर प्रत्यक्ष खरेदीचे भावही टिकून होते. मार्च महिन्यात कापसाचे भाव सरासरी ८ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री करताना बाजारातील चढ उताराकडे लक्ष असू द्यावे, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT