soybean rate  agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनसाठी आठ हमीभाव केंद्रे

सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. जिल्ह्यात दर वर्षी सोळा केंद्रांवर नोंदणी व खरेदी व्हायची.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्रांचा (Soybean Procurement Center) मुहूर्त ठरलेला नाही. परिणामी नोंदणी अजूनही सुरू झालेली नाही. आता सोयाबीन हमीभाव (Soybean MSP) केंद्र सुरू करण्याच्या हालचालींना वेग आलेला दिसून येत आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचे हमीभाव केंद्रे सुरू होण्याची शक्यता जिल्ह्यातून वर्तविली जात आहे.

सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. जिल्ह्यात दर वर्षी सोळा केंद्रांवर नोंदणी व खरेदी व्हायची. आता आठ केंद्र महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे आठ, तर आठ केंद्र विदर्भ मार्केटिंग फेडरेशनकडे आहेत. ‘नाफेड’ने सात केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविलेला आहे. मात्र, अजूनही शासनाकडून ते सुरू करण्यासंदर्भात हालचाली झालेल्या नाहीत.

सध्या सोयबीानचे दर वाढले आहेत. येणाऱ्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हमीभाव केंद्र सुरू करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात केंद्रे सुरू होण्याची प्रयत्न सुरू झाले आहेत. जिल्हा मार्केटिंग कार्यालयामार्फत पाटण, पांढरकवडा, महागाव, दिग्रस, आर्णी या केंद्रांचा प्रस्ताव आलेला आहे. ‘नाफेड’कडे असलेले उमरखेड केंद्राचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही.

आठ केंद्रे निश्‍चित केलेली असले तरी त्यापैकी प्रत्यक्ष किती सुरू होईल, हे मात्र गुलदस्तात आहे. सध्या सोयाबीनला मिळत असलेले दर पाहता आवक मंदावली आहे. खासगी बाजारातील दर वाढले तर ‘नाफेड’कडे येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी राहणार आहे. मात्र, त्यापेक्षा दर खाली जाऊ नये, यासाठी केंद्राची भूमिका महत्त्वाची आहे. केंद्र सुरू करण्याच्यादृष्टीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या हालचालींना वेग आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT