Eggs  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Eggs Rate : हिंदी भाषकांचा श्रावण सुरू; अंडी दर दबावात

Eggs Market Update : गेल्या तीन दिवसांपूर्वी ५५० रुपये प्रतिशेकडा या दराने अंड्यांचे व्यवहार होत असताना आता मात्र दरात १०० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. ४५० रुपये प्रतिशेकडा दर अंड्याला मिळत आहे.

Team Agrowon

Nagpur News : हिंदी भाषकांचा श्रावण सुरू होताच अंड्यांच्या दरात घट सुरू झाली आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी ५५० रुपये प्रतिशेकडा या दराने अंड्यांचे व्यवहार होत असताना आता मात्र दरात १०० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. ४५० रुपये प्रतिशेकडा दर अंड्याला मिळत आहे. यातून उत्पादकता खर्चाची भरपाई देखील होत नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

राज्याची रोजची अंडी मागणी एक कोटींच्या घरात आहे. राज्यभरातील लेअर पोल्ट्री व्यवसायिकांकडून त्याची पूर्तता होत नसल्याने हैदराबादसह देशातील इतर राज्यांतून देखील अंड्यांची आयात होते. त्यामुळेच गेल्या महिनाभरापासून अंडी दरात चांगलीच सुधारणा अनुभवली जात होती.

सरासरी ५५० रुपये प्रतिशेकड्यावर अंड्यांचे दर पोहचले होते. यापुढील काळात अंड्यांचे दर ६०० रुपयांवर जातील, अशी शक्‍यता या क्षेत्रातील जाणकारांकडून वर्तविण्यात आली होती. मात्र हिंदी भाषिक पट्ट्यात सुरू झालेल्या श्रावण महिन्यामुळे दरवाढीला खीळ बसली आहे. त्यामुळे अवघ्या दोनच दिवसांत अंड्यांच्या दरात तब्बल १०० रुपयांची घट झाली. ५५० रुपयांवरून थेट ४५० रुपये प्रतिशेकडा दर सध्या मिळत आहे.

दरम्यान, पुढील काळात मराठी भाषकांचा देखील श्रावण सुरू होईल. या काळात अंडी मागणीत आणखी घट होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे हैदराबादमधून आवक होणाऱ्या अंड्यांची विक्री ५३० रुपये शेकडा याप्रमाणे होत आहे.

त्या भागात स्थानिक सरकारकडून वीज दरात सवलत, पशुखाद्याच्या पुरवठ्यात सवलत मिळते. त्यामुळे त्यांचा प्रतिनग अंडी उत्पादकता खर्चही कमी होतो. त्यामुळे राज्याच्या इतर भागातून आवक होणाऱ्या अंड्यांचे दर कमी राहतात, असेही सांगण्यात आले.

दरवाढीमुळे चिंता वाढली

मक्‍याचा तुटवडा निर्माण झाल्याने २२०० रुपये क्‍विंटलचे दर वाढत २५००, २६५० आणि आता थेट २९०० रुपयांवर पोहचले आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचा उत्पादकता खर्च वाढून अंडी दरात मात्र घट झाली आहे. परिणामी हे व्यावसायिक संकटात आहेत.

साडेचार रुपये प्रतिनग अंडी उत्पादकता खर्च आहे. त्यात नाइलाजाने २९०० रुपये देत मक्‍याची खरेदी केली जात आहे तर अंड्याचे दर घसरल्याने उत्पादकता खर्चाची भरपाई देखील शक्‍य होत नाही. शासनाने सवलतीच्या दरात मका पुरवावा.
रवींद्र मेटकर, पोल्ट्री व्यावसायिक, अमरावती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT