Egg Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Egg Rate : थंडीमुळे अंडी दर पोहोचले ६०० रुपये शेकड्यांवर

Poultry Market : थंडीत वाढ होताच देशभरात अंड्यांच्या मागणीतही वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या अंड्यांच्या दराने चांगलीच उसळी घेतली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : थंडीत वाढ होताच देशभरात अंड्यांच्या मागणीतही वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या अंड्यांच्या दराने चांगलीच उसळी घेतली आहे. त्यातच मका आणि सोया पेंडच्या दरात घसरण झाल्याने प्रति नग अंड्याचा उत्पादकता खर्चही कमी झाल्याने लेअर पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सण, उत्सवाच्या कालावधीत अंडी मागणीत घट होते असा अनुभव आहे. परंतु यंदा मात्र तशी परिस्थिती उद्‍भवली नाही. या वेळी प्रति शेकडा (१०० नग) अंड्यांचे दर ५०० रुपयांच्या पुढेच होते. आता थंडीला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा दरात सुधारणा अनुभवली जात आहे. विदर्भात अमरावती हे अंडी उत्पादनाचे हब मानले जाते.

या भागातील अंड्यांना सध्या प्रति शेकडा ५७० रुपयांचा दर मिळत आहे. महाराष्ट्राची रोजची अंडी मागणी ही एक कोटीच्या घरात असल्याचे नॅशनल एग्ज को-ऑर्डीनेशन कमिटी (एनइसीसी) सांगते.

त्यानुसार सद्यःस्थितीत महाराष्ट्रात एक कोटीपेक्षा अधिक अंड्यांना मागणी आहे. त्यामुळेच दर वधारले आहेत. दिल्ली बाजारातही दर तेजीत असून, या ठिकाणी प्रति शेकडा ६०० रुपये, अहमदाबादमध्ये ५९०, हैदराबाद ५३५, तर मुंबई परिसरात अंडी दर प्रति शेकडा ६०५ रुपयांवर पोहोचले आहेत.

उत्पादकता खर्चात घट

सध्या सोया पेंड ४० रुपयांवरून २८ रुपये, तर मका २८ रुपयांवरून २२ रुपये किलोवर आला आहे. त्यामुळे पोल्ट्री खाद्याच्या दरातही घसरण झाली आहे. मका आणि सोया पेंड महाग असताना प्रति नग अंडी उत्पादकता खर्च साडेचार रुपये होता आता उत्पादकता खर्च कमी झाला आहे. परिणामी, लेअर पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

थंडीत वाढ होताच अंड्यांना देखील मागणी वाढली आहे. लेअर पोल्ट्री व्यावसायिकांकडे यापूर्वी काही प्रमाणात अंडी शिल्लक राहत होती. आजच्या घडीला व्यापाऱ्यांकडून रोजच्या रोज मागणी होत आहे. त्यामुळे दरातही तेजी आली असून, दर ५७० रुपये प्रति शेकडा इतके आहेत. मुंबई भागात अंडी दरांनी ६०० रुपयांचा पल्ला गाठला आहे. यापुढील काळात दरात आणखी सुधारणांचे संकेत आहेत.
- रवींद्र मेटकर, पोल्ट्री व्यावसायिक, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT