Maize Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Soybean Market : कापूस, मका, सोयाबीनमध्ये उतरता कल

Commodity Market Update गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात कापूस, मका, सोयाबीन व तूर यांचे भाव घसरले. हळद, मूग व हरभरा यांच्या भावात लक्षणीय वाढ झाली.

डॉ.अरूण कुलकर्णी

Agriculture Commodity Market : फ्यूचर्स किमती ः सप्ताह ६ ते १२ मे २०२३

गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात कापूस, मका, सोयाबीन व तूर यांचे भाव घसरले. हळद, मूग व हरभरा यांच्या भावात लक्षणीय वाढ झाली.

५ मे रोजी संपलेल्या सप्ताहात बहुतेक सर्व पिकांची आवक कमी झाली. कांद्याची आवक मात्र अजून वाढत्या पातळीवर आहे. टोमॅटोची आवकसुद्धा वाढली.

या वर्षी खाद्यतेलाच्या आंतर-राष्ट्रीय किमती घसरल्या. आपली आयातसुद्धा वाढली व त्यामुळे त्याच्या किरकोळ किमतीसुद्धा उतरू लागल्या आहेत. याचा परिणाम सोयाबीन व सरकी तेल यांच्या किमतींवर होत आहे. हळदीच्या भावात सध्या तेजी आहे.

१२ मे रोजी संपणाऱ्या सप्ताहातील किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात रु. ६१,९८० वर आले होते. या सप्ताहात ते २.९ टक्क्यांनी घसरून रु. ६०,१६० वर आले आहेत.

जून फ्यूचर्स भाव २.६ टक्क्यांनी घसरून रु. ६१,६८० वर आले आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स रु. ६३,००० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ४.७ टक्क्यांनी अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,५५४ वर आले होते. या सप्ताहात ते ३ टक्क्यांनी घसरून रु. १,५०८ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५६० वर टिकून आहेत. कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या महिन्यात घसरत आहेत. या सप्ताहात त्या पुन्हा १.४ टक्क्याने घसरून रु. १,७९५ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (जून डिलिव्हरी) किमतीसुद्धा १.५ टक्क्याने घसरून रु. १,८०९ वर आल्या आहेत.

ऑगस्ट फ्यूचर्स किमती रु. १,८३० वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.९ टक्क्याने अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात ४.२ टक्क्यांनी वाढून रु. ७,०४२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा २.७ टक्क्यांनी वाढून रु. ७,२३० वर आल्या आहेत.

जून फ्यूचर्स किमती ६.५ टक्क्यांनी वाढून रु. ८,०२४ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती रु. ८,१०० वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या ६ टक्क्यांनी अधिक आहेत. ऑक्टोबर भावसुद्धा (रु. ८,१७६) चांगला आहे. फ्यूचर्स विक्रीला संधी आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ०.५ टक्क्याने वाढून रु. ४,८०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा २.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,९१३ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. सध्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. आवक वाढू लागली आहे; मात्र गेल्या दोन सप्ताहांत ती कमी झाली आहे. आवकेचा परिणाम किमतींवर दिसत आहे.

मूग

मुगाच्या किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात ३.८ टक्क्यांनी घसरून रु. ८,२०० वर आली आहे. आवक कमी आहे.

सोयाबीन

सोयाबीनच्या स्पॉट किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) १.९ टक्क्याने वाढून रु. ५,३२८ वर आली होती. या सप्ताहात ती ०.५ टक्क्याने घसरून रु. ५,३०३ वर आली आहे. हमीभाव रु. ४,३०० आहे. सोयाबीनची आवक गेल्या दोन सप्ताहांत कमी झाली आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात ०.४ टक्क्याने घसरून रु. ८,२०० वर आली आहे. हमीभाव रु. ६,६०० आहे

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT