Chana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Procurement : सात-बारा अद्ययावत नसल्याने हरभरा नोंदणीत अडचण

सातबारावर यंदाच्या रब्बी पिकांच्या वर्षाबाबत माहिती अद्ययावत केलेली नसल्याने ही अडचण उद्‍भवली आहे.

Team Agrowon

Chana Market News अमरावती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांचा ऑनलाइन सातबारा महसूल विभागाने (Revenue Department) अद्ययावत केलेला नसल्याने शासनाच्या आधारभूत खरेदी प्रक्रियेसाठी हरभरा (Chana Procurement) नोंदणी करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सातबारावर यंदाच्या रब्बी पिकांच्या वर्षाबाबत माहिती अद्ययावत केलेली नसल्याने ही अडचण उद्‍भवली आहे. या खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्याची नावनोंदणी, पिकाचे नाव, वर्ष, सातबारावरील क्षेत्र गरजेचे करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांनी मोबाईलवरून पीकपेरा अद्ययावत केला असला, तरी सातबारा उतारावरील पिकाचे वर्ष मात्र महसूल विभागाने बदलवले नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांना हरभरा विक्रीकरिता नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. रब्बी हंगामात लागवड केलेल्या पिकांची क्षेत्रनिहाय व वर्षनिहाय नोंद सातबारावर घेणे गरजेचे असते. असा अद्ययावत सातबारा हा विविध उपयोगांसाठी कामात येतो. शासनाने हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.

ही नोंदणी तसेच खरेदीसाठी सातबाऱ्याची अट टाकण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचे जे पीक असेल त्याची यंदाची माहिती सातबारावर असणे गरजेचे करण्यात आलेले आहे. मात्र सध्या ऑनलाइन असलेल्या सातबारा उताऱ्यावर यंदाची नोंद बऱ्याच ठिकाणी महसूल विभागाकडून घेण्यात आलेली नाही.

सातबारा उताऱ्यावर वर्ष २०२२-२३ ऐवजी फक्त पीकपेरा २०२२ दर्शवत आहे. त्यामुळे नोंदणी प्रक्रियेत अडचण निर्माण होऊन शेतकऱ्यांची नोंदणी नाफेड पोर्टलवर होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

महसूल विभागाच्या चुकीमुळे मनस्ताप

शासनाने किमान आधारभूत किमतीने खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने नोंदणीसाठी २७ फेब्रुवारीपासून सुरुवात केली असली तरी अपडेट केलेला सातबाराच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करणेच शक्य झालेले नाही. शेतकरी केंद्रावर नोंदणीकरिता जाऊन माघारी परतत आहे. महसूल विभागांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Farmers Death : मराठवाड्यातील ५०१ पैकी २९७ शेतकरी आत्महत्यांची प्रकरण मदतीसाठी पात्र

Rohit Pawar On Farmers Issue: कृषिमंत्री कोकाटेंवर रोहित पवारांचा हल्लाबोल; 'मिस्टर जॅकेट' म्हणत केली टीका

Kharif Sowing : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत १५ लाख ४३ हजार ३७२ हेक्टरवर पेरणी

Sustainable Farming : शाश्वत शेतीकडे वळणे गरजेचे

Mango Farming : मोहर येण्याच्या प्रक्रियेला चालना देण्याचे तंत्र

SCROLL FOR NEXT