Grape Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Grape Export Issue: इस्राईल-हमासमधील युद्ध थांबल्यानंतरही वाहतूक बंदच; द्राक्ष निर्यातदारांची चिंता वाढली!

Israel-Hamas War Impact: इस्राईल-हमास युद्ध थांबले असले तरी सुएज कालव्यामार्गे मालवाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे द्राक्ष निर्यातीसाठी केप ऑफ गुड होप-दक्षिण अफ्रिकेमार्गे वाहतूक सुरू आहे, मात्र त्याला अधिक कालावधी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News: इस्राईल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबले असले तरी, सुएज कालव्यामार्गे माल वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे केप ऑफ गुड होप-दक्षिण अफ्रिकेमार्गे वाहतूक सुरू असून युरोप आणि रशियाला द्राक्ष निर्यात सुरू आहे. मात्र, द्राक्ष पोहोचण्यास ३० ते ३२ दिवसांचा कालावधी लागत असला तरी, काही अडचणींमुळे विलंबच होणार आहे. त्यामुळे निर्यातीसाठी वेळ कमीच मिळणार असल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत.

गतवर्षी इस्राईल आणि हमास यांच्यातील युद्धामध्ये गाझापट्टीवरील हल्ल्यात वाहतूक करणाऱ्या जहाजांवर हल्ला झाला होता. यामुळे माल वाहतुकीच्या जहाजांनी सुएज कालव्यामार्गे वाहतूक बंदचा निर्णय घेतला होता. या युद्धाची झळ सुएजमार्गे माल वाहतूक करणाऱ्या जहाजांना बसली होती. अचानक सुरू झालेल्या युद्धामुळे जहाजांना वाहतुकीचा मार्ग बदलावा लागला. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करता आले नसल्याने वेळेत जहाजांची उपलब्धता झाली नाही. त्यातच कंटेनरच्या भाड्यात वाढही झाली होती. याचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. या दरम्यान, कंटेनरचे भाडे ४२०० डॉलरपर्यंत पोहोचले होते.

देशातून द्राक्ष निर्यातीचा हंगाम सुरू झाला आहे. युरोप आणि रशिया या दोन देशांत सुएज कालव्यामार्गे निर्यात केली जाते. मात्र, इस्राईल आणि हमासमधील युद्धामुळे गतवर्षीपासून सुएजमार्गे वाहतूक बंद करण्यात आली आहे. सद्यःस्थितीला इस्राईल आणि हमासमधील युद्ध थांबले आहे. परंतु वाहतूक सुरू झाली नाही. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन जहाज कंपन्यांनी यंदा केप ऑफ गुड होप-दक्षिण अफ्रिकेमार्गे वाहतूक सुरळीत होण्यासाठी नियोजन केले असून वेळेत जहाजांची उबलब्धता होत आहे. युरोपिनय देशांत द्राक्षाला मागणी असल्याने निर्यातही सुरू आहे.

सुएजमार्गे वाहतुकीबाबत स्पष्टता नाहीच

दरम्यान, सुएज कालव्यामार्गे वाहतूक सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. जरी येत्या काळात या मार्गे वाहतूक सुरू करण्याचा निर्णय झाला तरी त्यासाठी एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागेल. तोपर्यंत द्राक्ष निर्यातीचा हंगाम संपेल. परंतु सुएज कालव्यामार्गे वाहतूक सुरू करण्याबाबत चर्चा सुरू नाही. त्यामुळे हा मार्ग सुरू होणार की नाही, याबाबत स्पष्टता नसल्याने द्राक्ष निर्यातदारांनी सांगितले.

गतवर्षीच्या तुलनेत कंटेनरचे भाडे कमी

दोन वर्षांपूर्वी सुएज कालव्यामार्गे युरोपला द्राक्ष पाठवण्यासाठी प्रति कंटनेर १८०० ते २००० डॉलर दर होता. गेल्या वर्षीपासून हा मार्ग बंद आहे. त्यामुळे काही शिपिंग कंपन्यांनी केप ऑफ गुड होप-दक्षिण अफ्रिकेमार्गे वाहतूक सुरू केली होती. त्यामुळे कंटरनेचे भाडे ४२०० डॉलरपर्यंत पोहोचले होते. यंदा वाहतुकीचे नियोजन आणि जहाजांची उपलब्धता असल्याने निर्यात सोईची होत आहे. यंदा कंनेटरचे भाडे २६०० ते ३००० डॉलर असून गतवर्षीच्या तुलनेत १२०० डॉलरने कमी झाले आहे.

द्राक्ष पोहोचण्यास विलंबच

सुएजमार्गे युरोपला द्राक्ष जाण्यासाठी २० ते २२ दिवसांचा कालवधी लागतो. गतवर्षी केप ऑफ गुड होपमार्गे ३० ते ४० दिवसांचा कालावधी लागता होता. मात्र, यंदा जहाजांची उपलब्धता आणि वाहतुकीच्या झालेल्या नियोजनामुळे गतवर्षीच्या तुलनेत द्राक्ष पोहोचण्याचा कालावधी ५ ते ८ दिवसांनी कमी झाला आहे. अर्थात २८ ते ३२ दिवसांत द्राक्ष पोहोचत आहेत. परंतु वाहतुकीच्या दरम्यान, काही अडचणी आल्याने जहाज पोहोचण्यास विलंबच होत आहे. परिमामी द्राक्ष खराब आणि रिजेक्ट होण्याची भीती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

गतवर्षी अचानक वाहतुकीत बदल केला. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. यंदा द्राक्ष वेळेत पोहोचण्यासाठी जहाज कंपन्यांनी नियोजन केले असून जहाजांची उपलब्धता होत आहे. परंतु निर्यातीसाठी वेळ कमी मिळणार आहे. तसेच एकाच वेळी दोन जहाज पोहोण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
राजाराम सांगळे, उपाध्यक्ष, भारतीय द्राक्ष निर्यात असोशिएशन
यंदाचा निर्यातीचा हंगाम चांगला सुरू झाला आहे. दर्जाही चांगला आहे. गतवर्षीप्रमाणचे वाहतूक सुरू आहे. त्यामुळे द्राक्ष पोहोचण्यास वेळ लागतोय. परंतु येत्या काळात काय परिस्थिती निर्माण होईल, हे आत्ता सांगणे कठीण आहे. सुएज कालव्यामार्गे वाहतूक सुरू होण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत.
विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मस नाशिक
सुएज कालव्‍यामार्गे वाहतूक सुरू झाली तर द्राक्ष वेळेत पोहोचतील आणि द्राक्षाचे दरही वाढलीत. परंतु यामध्ये केंद्र सरकारने लक्ष घालून सुएज कालव्यामार्गे वाहतुक सुरळीत करावी.
कैलास भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT