Mango Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Season : गुढीपाडव्यानिमित्त वाढली विविध आंब्यांना मागणी

Mango Demand : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाडव्यानिमित्त शुक्रवार (ता. ५) पासून आंब्याच्या आवकेत वाढ होऊ लागली आहे. गेल्या चार दिवसांपासून दररोज पाच ते सहा हजार पेट्यांची आवक होत होती.

गणेश कोरे

Pune News : उद्या (ता.९) साजऱ्या होणाऱ्या पाडवा सणानिमित्त पुणे बाजार समितीमध्ये कोककणासह कर्नाटक राज्यातून आंब्याची आवक वाढली आहे. आवकेबरोबर मागणी देखील वाढली असून, दर संतुलित असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाडव्यानिमित्त शुक्रवार (ता. ५) पासून आंब्याच्या आवकेत वाढ होऊ लागली आहे. गेल्या चार दिवसांपासून दररोज पाच ते सहा हजार पेट्यांची आवक होत होती. ही आवक रविवारी (ता. ७) वाढून १० हजार पेट्यांवर गेली होती.

सध्या होणारी आवक ही कच्च्या पेट्यांची असून, अनेक व्यापाऱ्यांनी कच्च्या पेट्यांची खरेदी करून आंबे पिकण्यास आढी लावली आहे. सध्या ४ ते ६ डझनाच्या कच्च्या पेटीला २ ते ३ हजार आणि तयार आंब्याच्या पेटीला २५०० ते ३००० रुपये दर असल्याचे कोकण हापूसचे प्रमुख आडतदार करण जाधव यांनी सांगितले.

कर्नाटक आंब्याची सुमारे ७ हजार पेट्यांची आवक झाल्याची माहिती रोहन उरसळ यांनी दिली. या वेळी कर्नाटकच्या आंब्यात कर्नाटक हापूसला (४ -५ डझन) १००० ते १८००, पायरीला १००० ते २०००, लालबागला ४० ते ६० रुपये किलो आणि बैंगणपल्लीला ६० ते ८० रुपये प्रतिकिलो असे दर होते.

‘पणन’च्या महोत्सवाला प्रतिसाद

पणन मंडळाच्या आंबा महोत्सवात रविवारी (ता. ७) आंबा खरेदीसाठी घरगुती ग्राहकांनी गर्दी केली होती. पाडव्यानिमित्त गृहिणींची खरेदी वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. महोत्सवात फळांच्या आकारानुसार ५०० ते ८०० रुपये डझन दर होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT