Agriculture Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : हरभऱ्याचे भाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर?

Daily Commodity Rates : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, आले आणि हरभरा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन दबावातच

सोयाबीन उत्पादक यंदा भाव पडल्याने अडणीत आले आहेत. भावावरील दबाव कायम आहे. खुल्या बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव प्रतिक्विंटल ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहे.

सोयाबीनची हमीभावाने सरकार खरेदी करत आहे. मात्र ही खरेदी खूपच धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे त्याचा आधार खुल्या बाजारात मिळताना दिसत नाही. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. आज सोयाबीनचे वायदे ९.७० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस स्थिर

देशात कापसाचे भाव स्थिर आहेत. कापसाच्या भावात सुधारणा होण्याची शेतकरी वाट पाहत आहेत. मात्र बाजारावर सध्या आवकेचा दबाव आहे. कापसाची आवक सध्या शिगेला पोचली. रोज २ लाख गाठींपेक्षा आवक होत असून काल २ लाख १२ हजार गाठींची आवक झाली होती.

त्याचा कापूस बाजारावर दबावात आहे. आजही देशातील बाजारात ६ हजार ९०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर सीसीआयची खरेदीही सुरु आहे. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांदा भाव कमी झाले

कांद्याच्या भावात मागील १० दिवसांमध्ये मोठी घट झाली. कांद्याचे भाव निम्म्यावर आले आहेत. देशातील महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांद्याचे भाव घसरले आहेत. कांद्याचे भाव मागील २ आठवड्यांमध्येच क्विंटलमागे २ हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. बाजारात सध्या कांद्याची आवक वाढत आहे.

खरिप कांद्याची काढणीही जोमाने सुरु आहे. मात्र निर्यातीवर २० टक्के शुल्क असल्याने अडथळे निर्माण होत आहेत. याचा दबाव बाजारात दरावर दिसत आहे. कांद्याला सरासरी १ हजार ७०० ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील कांदा आवकेतील वाढ कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभरा नरमला

हरभऱ्याचे भावही मागणी काही आठवड्यांपासून नरमले आहेत. हरभऱ्याच्या भावातील तेजी कमी झाल्यानंतर आवक कमी दिसत आहे. यंदा हरभरा उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तसेच आयातही चांगली राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. मात्र प्रत्यक्ष बाजारात किती माल येतो यानंतर बाजाराची दिशा ठरेल. सध्या देशातील बाजारात हरभरा भाव ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. हरभरा बाजारात नवा माल दाखल होईपर्यंत चढ उतार दिसू शकतात, असे हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

आले भाव पडले

आल्याचे बाजारभाव मागील काही दिवसांपासून दबावात आले आहेत. नव्या मालाची आवक सुरु झाल्यानंतर दर कमी झाले आहेत. यंदा राज्यात यंदा आले पिकाचे क्षेत्र वाढले होते. त्यामुळे आले उत्पादनात यंदा वाढ होईल, असा अंदाज आधिपासून व्यक्त केला जात होता.

बाजारातील आवक वाढल्यानंतर दरावर दबाव वाढत गेला. सध्या आल्याला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ६ हजारांचा भाव मिळत आहे. आल्याच्या भावावरील दबाव काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT