Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : रोज ३० हजार क्विंटल कापसाची बाजारांत आवक

Cotton Update : देशातील बाजारांत सध्या रोज ३० ते ३२ हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. ही आवक मागील हंगामाच्या तुलनेत कमी आहे.

Team Agrowon

Jalgaon News : देशातील बाजारांत सध्या रोज ३० ते ३२ हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. ही आवक मागील हंगामाच्या तुलनेत कमी आहे. आवक कमी असल्याने दरात सुधारणा दिसत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

मागील वर्षी देशात ऑक्टोबरच्या सुरुवातीला रोज सहा ते सात हजार गाठींच्या कापसाची आवक होत होती. यंदा मात्र ही आवक कमी आहे. कारण यंदा कापूस लागवड उत्तरेकडे घटली आहे. सध्या उत्तरेकडेच कापसाची आवक आहे. राज्यासह गुजरात, मध्य प्रदेशात अलीकडेच कापूस वेचणी सुरू झाली आहे. यामुळे कापूस आवक कमी आहे. आवक कमी असल्याने दरात फारशी घट दिसत नसल्याचे चित्र आहे. पुढील सात ते आठ दिवसांनंतर ५० ते ५५ हजार क्विंटल कापसाची आवक आवक होईल. तर नोव्हेंबरमध्ये आवकेत बऱ्यापैकी वाढ होईल. शेतकऱ्यांकडे कापूससाठा अल्प आहे.

राज्यात खानदेशसह अन्य भागांत अद्याप कापसाची आवक कमी असल्याने कापसाची खेडा खरेदी सुरू झालेली नाही. कापसाचे दर राज्यात किंवा देशात वेगवेगळे आहेत. खानदेशात सध्या दर्जेदार कापसाला प्रतिक्विंटल ८१०० रुपये दर आहे. तर नव्या कापसाची खरेदी ७५०० रुपये प्रतिक्विंटल या दरात केली जात आहे.

शेतकऱ्यांकडील साठा कमी

सध्या देशात कापसाची आवक रखडत सुरू आहे. अर्थात शेतकऱ्यांकडे कापूस अद्याप साठविण्यास सुरुवात झालेली नाही. यंदा कोरडवाहू कापसाचे उत्पादन एकरी ८० किलो ते एक क्विंटल एवढेच येऊ शकते. तसेच अतिपावसात महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशात कापसाची हानी झाली आहे.

तेलंगणात उत्पादनात मोठी घट होऊ शकते, असेही संकेत आहेत. देशात एकूण ३१० लाख गाठींचे उत्पादनही शक्य नाही, असेही सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांकडील अधिकचा साठा, आवकेने दरांवरील दबाव हा मुद्दा यंदाच्या बाजारासंबंधी फारसा चर्चेत राहणार नाही, असेही जाणकार सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT