Raisin Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Raisin Price : बेदाणा दरात पंधरा रुपयांची वाढ

Market Price Update : शून्य पेमेंट आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या पहिल्या बेदाणा सौद्यामध्ये मागणी वाढली आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात पंधरा रुपयांची वाढ झाली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : शून्य पेमेंट आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या पहिल्या बेदाणा सौद्यामध्ये मागणी वाढली आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात पंधरा रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बेदाण्याला दर्जा नुसार प्रति किलोस १२० ते २२५ रुपये असा दर आहे. दरम्यान, शेतकऱ्यांकडे किती बेदाणा शिल्लक आहे, आणि बाजारात आवक किती येईल, याचा अंदाज सध्यातरी लावणे कठीण आहे. बेदाण्याचे दर टिकून राहतील, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

दसऱ्यानंतर बेदाणा सौदे मोठ्या प्रमाणावर होतात. दिवाळीपूर्वी शून्य पेमेंटसाठी बेदाणा सौदे बंद ठेवले जातात. यंदाही शून्य पेमेंटसाठी १७ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबरपर्यंत सौदे बंद ठेवले होते. मात्र, निवडणुकीमुळे शून्य पेमेंट पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी २१ नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण पेमेंट पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू ठेवल्या होत्या.

गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी शून्य पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीनंतर बेदाण्याचे सौदे झाले. दिवाळीनंतर झालेल्या सांगली मार्केट यार्डातील बेदाणा सौद्यांमध्ये चांगलीच आवक झाली. अनेक व्यापाऱ्यांना देशभरातील व्यापारांकडून बेदाण्याची मागणी असल्याने मोठ्या प्रमाणावर खरेदी केले होते.

दिवाळीपूर्वी बेदाण्याच्या दरात दहा रुपयांची वाढ झाली होती. सध्या बाजारपेठेत बेदाण्याची आवक कमी आहे. तसेच मागणी अधिक आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात वाढ झाली आहे. परंतु शेतकऱ्यांकडे बेदाणा किती शिल्लक आहे. याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून घेतला जात असल्याचे चित्र आहे. वास्तविक पाहता, गेल्या वर्षभरात बेदाण्याच्या दरात फारसा चढ-उतार झाला नाही. बेदाण्याचे दर टिकून राहिले आहेत. त्यामुळे बेदाणा विक्रीसाठी उत्पादकांनी पुढाकार घेतला आहे.

त्यामुळे सध्यातरी बेदाण्याच्या दरात प्रति किलोस १५ रुपयांनी दर वाढल्याने उत्पादक शेतकऱ्यांना दिसाला मिळाला आहे. दिवाळीनंतर बेदाण्याचे दरात वाढ होते. त्यानंतर नवीन बेदाणा येईपर्यंत दर स्थिर राहतात. यंदाही बेदाण्याचे दर स्थिर राहतील, असा अंदाज बेदाणा व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

हिरवा बेदाण्याला प्रति किलोस १३० ते २००, पिवळा बेदाण्याला प्रति किलोस १२० ते १८० तर लक्झरी बेदाण्याला (एक नंबर प्रतिचा) सरासरी २२५ रुपये असा दर आहे. मात्र, लक्झरी बेदाण्याची आवक फार कमी असल्याने या बेदाण्याला मागणीही अधिक आहे. बेदाण्याचे दर वाढल्याने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

यंदाचा हंगाम कठीण

सध्या मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे द्राक्षबागा संकटात आहेत. अद्याप छाटणी असल्यामुळे अनेक बागा फ्लाँरिंग व पोग्या स्टेजमधील बागा खराब झाल्या आहेत. त्यामुळे यंदाचा बेदाणा निर्मितीचा हंगाम कठीण आहे. तसेच यंदाचा बेदाणा निर्मितीसाठी जानेवारी महिन्यापासून सुरुवात होईल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

बाजारात बेदाण्याची आवक कमी आहे. त्यामुळे बेदाण्याचे दर वाढले आहेत. सध्या बेदाण्याची आवक आणि मागणीचे चित्र असेच राहील. त्यामुळे बेदाण्याचे दर टिकून राहतील.
सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT