Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : परभणी जिल्ह्यात कापूस दरात नरमाईच

Cotton Rate : मॉन्सू्न्नोत्तर पावसात भिजलेल्या कापसाचे दर ५४०० ते ६४०० रुपये तर न भिजलेल्या कापसाचे दर ६८५० ते ७००० रुपयांपर्यंत आहेत.

माणिक रासवे

Parbhani News : जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कापूस दरात नरमाईच आहे. आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने कापूस खरेदी केली जात आहे. मॉन्सू्न्नोत्तर पावसात भिजलेल्या कापसाचे दर ५४०० ते ६४०० रुपये तर न भिजलेल्या कापसाचे दर ६८५० ते ७००० रुपयांपर्यंत आहेत.

सेलू बाजार समितीत सोमवारी (ता. १५) न भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ६९९५ ते कमाल ७२०० रुपये तर सरासरी ७१३५ रुपये दर मिळाले. पावसात भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल ५४०० ते कमाल ६८०० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. ९) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६८५० ते कमाल ७०६५ रुपये तर सरासरी ६९४० रुपये दर मिळाले.

ढगाळ वातावरणामुळे बुधवारी (ता. १०) व गुरुवारी (ता. ११) कापूस आवक बंद राहिली. मानवत बाजार समितीत शुक्रवारी (ता. १२) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६९५० ते कमाल ७०५५ रुपये तर सरासरी ७०५० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. ११) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७०७० रुपये तर सरासरी ७०२५ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. ९) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६९५० ते कमाल ७०५० रुपये तर सरासरी ७०२५ रुपये दर मिळाले.

भिजलेल्या कापसाला शुक्रवारी (ता. १२) प्रतिक्विंटल किमान ५८०० ते कमाल ६४०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ११) किमान ५८०० ते कमाल ६४०० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. ९) प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ६४०० रुपये दर मिळाले. दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी अद्याप कापूस साठवून ठेवलेला आहे. परंतु दरात सुधारणा होत नसल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT