परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : परभणी बाजार समितीत उद्यापासून कापूस खरेदी

Parbhani APMC : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टी.एम.सी. मार्केट यार्डात मंगळवारी (ता. २१) सकाळी ११ वाजल्यापासून खासगी व्यापाऱ्यांमार्फत जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदीस प्रारंभ होणार आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टी.एम.सी. मार्केट यार्डात मंगळवारी (ता. २१) सकाळी ११ वाजल्यापासून खासगी व्यापाऱ्यांमार्फत जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदीस प्रारंभ होणार आहे.

शेतकऱ्यांनी मार्केट यार्डात कापसाची वाहने आणल्यानंतर ती क्रमवारपणे लावून जाहीर लिलावाची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या बाबतची सौदापट्टी घेऊन संबंधित जिनिंगवर आपली वाहने घेऊन जावीत.

कोणत्याही प्रकारे जिनिंग आवारात परस्पर वाहने घेऊन न जाता दुपारी १२ वाजेपर्यंत टी.एम.सी. मार्केट यार्डात आणावीत. उशिराने येणाऱ्या वाहनधारकांची निश्‍चितच गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असून, शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणतेवेळी कापूस ओला न आणता स्वच्छ स्वरूपात विक्रीस आणावा.

चांगल्या प्रतीचा कापूस हा वेगळा व खराब प्रतीचा कापूस वेगळा करून आणल्यास बाजार भावाबाबत कोणतीही तक्रार उद्‍भवणार नाही. त्यामुळे कापसास जास्तीत जास्त बाजार भाव मिळेल.

शेतकऱ्यांनी आपला कापूस परभणी बाजार समितीच्या टी.एम.सी. मार्केट यार्डात विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, उपसभापती अजय चव्हाण, सर्व संचालक मंडळ व सचिव संजय तळणीकर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT