Cotton Procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Procurement : ‘सीसीआय’कडून खुल्या बाजारात कापूस खरेदी

भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय) कडून सालासर कॉटन प्रायव्हेट लिमिटेड भोकर फाटा (कलदगाव) येथे खुल्या बाजारातील दरानुसार कापूस खरेदीचा प्रारंभ मंगळवारी (ता.२०) झाला.

टीम ॲग्रोवन

नांदेड : भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय) (CCI) कडून सालासर कॉटन प्रायव्हेट लिमिटेड भोकर फाटा (कलदगाव) येथे खुल्या बाजारातील दरानुसार (Cotton Rate) कापूस खरेदीचा (Cotton Procurement) प्रारंभ मंगळवारी (ता.२०) झाला.

सध्या बाजारात कपाशीला हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. त्यामुळे भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय) खुल्या बाजारात कपाशी खरेदीत उतरला आहे. या खरेदीस प्रारंभ मंगळवारी झाला.

या वेळी केंद्र प्रभारी महेंद्रपालसिंग यादव, नांदेड बाजार समितीचे सचिव वामनराव पवार, सालासर कॉटस्पिन्स मालक नरेश गोएंका, श्रीराम मेडेवार, नंदू महाजन, मार्केट कमिटीचे सहसचिव भारसावडे आदी उपस्थित होते. या वेळी मुहूर्तावर शेतकऱ्याच्या कपाशीला प्रतिक्विंटल ८ हजार १०० रुपये दर मिळाल्याची माहिती पवार यांनी दिली.

शेतकऱ्यांनी आपली कपाशी खासगी व्यापाऱ्यांना न देता ‘सीसीआय’ला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दत्ता नादरे, एकनाथ मोगरकर, धम्मपाल सरोदे, बालाजी गव्हाणे, संतोष कपाटे, शेतकरी शंकर राजेगोरे, शेख मुस्तफा, व्यंकटी खांढरे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT