Team Agrowon
काही दिवसांपूर्वी गावाकडे भेट दिली आणि जुने दिवस आठवले. इयत्ता १० वी पासून ते पार पोस्ट ग्रॅज्युएशन च्या द्वितीय वर्षापर्यंत माझ्या सुट्ट्या ह्याच कामात गेल्या !
कप्पा, हाईट आणि कोपरे हे लावण्यात मी प्रसिध्द होतो. हे काम म्हणजे अत्यंत जोखमीचे म्हणजे जर कापसाचे थर रचत असताना तुमचा पायही स्लिप होण्याची शक्यता असायची.
पूर्वी पासूनच कामाची लाज कधीच बाळगली नाही, हाताला जे मिळेल ते काम केलंय. अगदी आवडीने. कारण जाणीव होती परिस्थितीची. पार सकाळ पासून गेल्यावर संध्याकाळी कधी परतू याची काही शास्वती नसायची मग रात्री बेरात्रीं.
घरी आल्यावर चूप चाप आपल्या गोधडीवर जाऊन झोपायचं. किती ही शांतपणे गेलं तरी मात्र आईला कळणार नाही ती आई कसली.
आई म्हणायची "काय त्या हमाली करतो रे मस्त शिकायचं मोठं साहेब व्हायचं यात काय पडलं मेल्या" आणि आईला नेहमी प्रमाणे उत्तर दयाचो की "आई देईल हे पण सोडून एक दिवस वेळ आल्यावर" आणि शेवटी वेळ आल्यानंतर सोडलं देखील !!
एका हमाली पासून ते आज एक डॉक्टरेट चा प्रवास खूप अविस्मरणीय आहे माझ्यासाठी !!