Cotton Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : भारतासह चीन, पाकिस्तानात कापसाचे भाव तेजीत

कापसाचा बाजार हा एका देशापुरता मर्यादित नाही. आपल्या येथील कापसाचे भावही जागतिक भावावर अवलंबून असतात. भारतातून दुसऱ्या देशांमध्ये कापूस आणि कापड निर्यात चांगली झाली की आपल्या कापसालाही चांगला भाव मिळतो.

अनिल जाधव

पुणे ः कापसाचा बाजार (Cotton Market) हा एका देशापुरता मर्यादित नाही. आपल्या येथील कापसाचे भावही (Cotton Rate) जागतिक भावावर अवलंबून असतात. भारतातून दुसऱ्या देशांमध्ये कापूस आणि कापड निर्यात (Cotton Export) चांगली झाली की आपल्या कापसालाही चांगला भाव मिळतो.

यंदा अमेरिका, पाकिस्तान, भारत, इंडोनेशिया आणि बांगलादेशमध्ये कापूस उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. तर, भारताप्रमाणेच चीन आणि पाकिस्तानमध्येही कापसाचे भाव तेजीत आहेत.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात यूएसडीएने जागतिक कापूस उत्पादन घटीचा अंदाज व्यक्त केला. यंदा जागतिक कापूस उत्पादन ४ लाख गाठींनी कमी होऊन १ हजार ४६५ लाख गाठींवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला.

मागील हंगामात १ हजार ४६९ लाख गाठी उत्पादन मिळाले होते. मागील हंगामात चीनचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. त्यामुळे मागील हंगामातील शिल्लक साठा अधिक होता. परिणामी यंदा कापूस पुरवठा अडीच हजार लाख गाठींवर पोहोचला.

यूएसडीएच्या मते, यंदा ब्राझीलमधील उत्पादन काहीसे वाढून १६८ लाख गाठींवर पोहोचले. मात्र भारत, अमेरिका, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांमधील कापूस उत्पादन घटले. अमेरिकेतील उत्पादन ३५ लाख गाठींनी कमी झाले.

यंदा अमेरिकेत १८७ लाख गाठी कापूस झाला. तर, भारतात ३३० लाख गाठी उत्पादन होईल. पाकिस्तानमध्ये यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. पाकिस्तानमधील उत्पादन २९ लाख गाठींनी कमी होऊन ४७ लाख गाठींवर स्थिरावेल, असे यूएसडीएने म्हटले आहे.

कापूस वापर वाढू शकतो

जागतिक मंदीच्या अहवालामुळे यूएसडीएने यंदा कापूस वापर ८५ लाख गाठींनी घटण्याचा अंदाज व्यक्त केला. यंदा जगाचा कापूस वापर १ हजार ४०७ लाख गाठींवर स्थिरावेल.

यूएसडीएने चीनचा कापूस वापर गेल्या वर्षीएवढा म्हणजेच ४२५ लाख गाठींवर कायम ठेवला. पण चीनमधील कोरोना निर्बंध आता शिथिल होत आहेत. त्यामुळे चीनचा कापूस वापर वाढेल. तसेच इतरही देशांमधील वापर अधिक होईल, असा अंदाज आहे.

सीबॉटवरील दर पातळी

सीबॉटवर कापसाचे वायदे मागील दीड महिन्यात ७९ सेंट ते ८९ सेंट प्रतिपाउंडच्या दरम्यान राहिले. रुपयांत रुईचा भाव १४ हजार २२५ ते १६ हजार रुपये होतो. तर कॉटलूक ए इंडेक्स म्हणजेच, जगातील महत्त्वाच्या देशांमध्ये प्रत्यक्ष कापूस खरेदीचा सरासरी भाव काहीसा स्थिर दिसला. ए इंडेक्स १०० च्या दरम्यान होता.

चीन, पाकिस्तानमध्येही तेजी

चीनमधील कापसाचे दर मागील पंधरवड्यात काहीसे वाढले. चीनमध्ये सध्या रुईला १७ हजार ५०० ते १८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. कोरोना निर्बंध कमी झाले तसा चीनमधील कापूस बाजार सुधारला.

तर, भारतातील रुईचे दर १७ हजार ५०० ते १८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तसेच पाकिस्तानमधील कापसाचे दरही वाढले आहेत. पाकिस्तानमध्ये मागील दीड महिन्यात रुईला सरासरी १६ हजार ते १९ हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला.

देशात दर वाढतील

कापसाचे भाव केवळ भारतातच जास्त नाही, तर चीन आणि पाकिस्तानमध्ये तेजीत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्यास देशातील कापूस दरही वाढतील. आज भारतातील कापूस दरात काहीशी वाढ पाहायला मिळाली.

आज कापसाची सरासरी दरपातळी ८ हजार ३०० ते ८ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहे. पुढील काळात कापसाचे दर वाढण्याची शक्यता असल्याचेही जाणकारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT