Anil Jadhao
आंतरराष्ट्रीय बाजारात काल कापसाचे वायदे ८२.९६ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. क्विंटलमध्ये वायद्यांमधील हा दर १४ हजार ८८४ रुपये होतो. आज सायंकाळपर्यंत कापूस वायदे ८४.५२ सेंटपर्यंत वाढले. रुपयात सांगायचं झालं तर हा दर १५ हजार १६४ रुपये होतो.
आज देशातील काही बाजारांमध्ये कापसाचे भाव काहीसे वाढले होते. काही ठिकाणी दरात क्विंटलमागं १०० ते १५० रुपयांची सुधारणा दिसून आली.
काही बाजारांमधील कमाल दरानं म्हणजेच, जास्तीत जास्त दरानं ८ हजार ८०० रुपयांचा टप्पा पार केला. पण अगदी कमी बाजारात असा दर मिळाला.
पण कापसाचा किमान दर ८ हजार रुपयांपेक्षा जास्त आहेत. तर देशातील सरासरी दरपातळीही किंचित वाढली. आज कापसाला सरासरी ८ हजार २०० ते ८ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला.
पुढील काही दिवसांमध्ये कापूस दर वाढतील. पुढील दोन ते तीन महिन्यापर्यंत कापसाची भाव पातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते.
शेतकऱ्यांनी ८५०० रुपयांपेक्षा कमी दरात कापूस विकू नये. बाजाराचा आढावा घेऊन विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.