Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Payment : कापूस उत्पादकांचे चुकारे ‘सीसीआय’कडे अडकले

Cotton Market : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) विविध खरेदी केंद्रांत कापसाची विक्री केलेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप चुकारे मिळालेले नाहीत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) विविध खरेदी केंद्रांत कापसाची विक्री केलेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप चुकारे मिळालेले नाहीत. बँक खाते आधारशी लिंक नसणे, जनधन खात्यांची मर्यादा व अन्य कारणांनी चुकारे प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी आहेत.

बाजारात कापसाला हमीभावाएवढा दर नसल्याने अनेकांनी ‘सीसीआय’च्या केंद्रांत कापसाची विक्री केली. त्यावेळी शेतकऱ्यांचे बँक खाते, आधार याचाही तपशील घेतला होता. कापसाची विक्री केल्यानंतरही आधार व सातबारा उतारा घेण्यात आला.

दोन दिवसांत पेमेंट बँक खात्यात येईल, असा दावा खरेदी केंद्रातील संबंधितांनी केला होता. परंतु सात ते आठ दिवस उलटूनही पेमेंट बँक खात्यात न आल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. नेमके चुकारे का आलेले नाहीत, याची माहिती घेण्यासाठी बँक व ‘सीसीआय’च्या केंद्रांत शेतकरी चकरा मारत आहेत.

काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांना मर्यादा आहे किंवा त्यात फक्त शासकीय योजनांचे वेतन किंवा अल्प निधीच येऊ शकतो. त्यात ५० हजार रुपये किंवा एक, दोन लाख रुपये येऊ शकत नाहीत. काही बँक खात्यांचे नाव आधारशी जुळत नाही. त्यामुळे ते आधारशी लिंक होत नाहीत. अनेकांचे बँक खाते आधारशी लिंक नाही.

अनेक शेतकऱ्यांना बँकेत जाऊन नवे बँक खाते उघडावे लागत आहे. यात बँका सात ते आठ दिवसांत नवे बँक खाते सुरू करू, असे सांगत आहेत. यामुळे चुकाऱ्यांना आणखी विलंब होत आहे. खानदेशात सुमारे २५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे चुकारे ‘सीसीआय’कडे विविध कारणांनी अडकले आहेत.

धनादेश देण्याची मागणी

ज्या शेतकऱ्याच्या नावाने कापसाची विक्री झाली आहे, त्यांच्या नावाचे ‘सीसीआय’ने धनादेश द्यावेत, अशी मागणी होत आहे. कारण अनेक शेतकरी वृद्ध असून, त्यांना नवे बँक खाते उघडणे किंवा रोज बँका, ‘सीसीआय’च्या कार्यालयात चकरा मारणे शक्य नाही. यामुळे सातबारा, आधार आदी तपशील तपासून शेतकऱ्यांना धनादेश द्यावेत. ते धनादेश राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकेत स्वीकारले जावेत व लागलीच शेतकऱ्यांना चुकारे मिळावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT