Agriculture Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : कापूस वायदे नरमले; कापूस, सोयाबीन, तूर तसेच हळदीचे दर काय आहेत?

Agriculture Market : आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, हळद आणि उडीद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : सोयाबीनच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे वाढून १२.५० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे वाढून ३८८ डाॅलर प्रतिटनांवर होते.

देशातील बाजारातही काही प्रमाणात चढ उतार दिसत असले तरी सरासरी भावपातळी मात्र कायम आहे. देशातील बाजारात सोयाबीनला आजही ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज आहे. 

कापसाच्या वायद्यांमध्ये मागील चार दिवसांमध्ये काहीशी सुधारणा झाल्यानंतर आज मात्र वायदे नरमले. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही कापसाच्या वायद्यांमध्ये लक्षणीय घट झाली. आंतरराष्ट्रीय वायदे पुन्हा ८० सेंटवर आले.

तर देशातील वायदे ५७ हजार ७७० रुपये प्रतिखंडीवर आले होते. बाजार समित्यांमधील भावापातळी काही प्रमाणात कमी जास्त होत आहे. मात्र सरासरी भाव ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या कायम आहे. कापूस बाजारातील चढ उतार दोन ते तीन आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी दिला. 

तुरीची भावपातळी मागील काही आठवड्यांपासून टिकून आहे. तुरीला उठाव मिळत असल्याने भावाला आधार आहे. काही आठवड्यांपुर्वी तुरीच्या भावात आलेली काहीसे नरमाई दूर झाल्याचे दिसत आहे.

देशभरातील बाजारातील सरासरी भाव १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

हळदीचे भाव देशातील बाजारांमध्ये टिकून आहेत. हळद बाजारातील तेजी हंगामाच्या आधीपासूनच आहे. यंदा उत्पादन घटले पण हळदीला चांगली मागणी आहे. सध्या हळदीला सरासरी १४ हजार ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील. पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते. त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून उडदाचे भाव टिकून आहेत. उडदाची बाजाराील आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे मागणी चांगली आहे. सरकारने उडदाचे भाव कमी कऱण्यासाठी अनके निर्णय घेतला.

पण तरीही सरकारला अपेक्षेप्रमाणे भाव पाडता आले नाहीत. सध्या उडदाचा भाव ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. उडदाच्या भावातील ही तेजी कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT