Agriculture Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : कापूस वायदे दबावातच; कापूस, सोयाबीन, गहू तसेच काय आहेत लसूण दर ?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, गहू, आले आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. सोयाबीनचे वायदे आणि देशातील भाव सतत एकाच पातळीदरम्यान दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ११.५६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३३४ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली आहे. तरीही आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि स्वस्त खाद्यतेल आयातीचा दबाव आहे. त्यामुळे सोयाबीन मागील दोन महिन्यांपासून ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत ७३.४१ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५८ हजार ५१० रुपये प्रतिखंडीवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील वायद्यांमध्ये मागच्या आठवड्यात सुधारणा झाल्यानंतर दरात पुन्हा नरमाई आली आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

गव्हाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. सरकारने गव्हावर स्टाॅक लिमिट लावल्याचा परिणाम दरावर काही प्रमाणात दिसून आला. बाजारात गव्हाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी झाल्याने सध्या गव्हाचे भाव मात्र सरकारला अपेक्षित पातळीवर कमी झाले नाहीत. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ४०० ते २ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मागील वर्षभर आल्याला चांगला भाव मिळाला. त्यामुळे नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली. याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे. आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी भावपातळी सध्या ६ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

राज्यात लसणाचे भाव तेजीत आहेत. बाजारातील लसणाची आवक खूपच कमी आहे. सरासरीपेक्षा आवक जवळपास ३० टक्क्यांपर्यंत कमी असल्याचे व्यापारी सांगत आहे. केवळ राज्यातच नाही तर देशभरात लसणाचा पुरवठा कमी आहे. पण दुसरीकडे लसणाची मागणी टिकून आहे. त्यामुळे लसणाचे भाव मागील काही महिन्यांपासूनच तेजीत आहेत. सध्या लसणाला गुणवत्तेप्रमाणे १४ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

Crop Damage: मे, जूनमध्ये पावसामुळे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाची माहिती

Goras Bhandar Closure: गोरस भंडारावर कारवाई; दररोज होणाऱ्या ३ हजार ५०० लिटर दूध संकलनावर परिणाम

Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना

Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT