Tur Market Q Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Commodity Market : कापूस, हरभरा, तूर, हळदीच्या दरात किंचित वाढ

Tur Rate : तुरीची आवक आता कमी होऊ लागली आहे. ७ फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहात ती ८० हजार टन या विक्रमी पातळीवर गेली होती. नंतरच्या सप्ताहात ती ५२ हजार टनांवर आली.

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती ः सप्ताह १५ ते २१ फेब्रुवारी २०२५

तुरीची आवक आता कमी होऊ लागली आहे. ७ फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहात ती ८० हजार टन या विक्रमी पातळीवर गेली होती. नंतरच्या सप्ताहात ती ५२ हजार टनांवर आली. इतर पिकांची आवक कमी होऊ लागली आहे. हरभऱ्याची आवक मात्र आता हळूहळू वाढू लागली आहे.

महिनाअखेर ती अधिक गतीने वाढू लागेल. या सप्ताहात कापूस, हळद, हरभरा व तूर वगळता सर्व पिकांच्या किमती कमी झाल्या. २१ फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात ०.१ टक्का वाढून रु. ५३,६८० वर आले आहेत. मार्च फ्यूचर्स भाव ०.८ टक्का वाढून रु. ५४,४२० वर आले आहेत. मे भाव रु. ५५,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा २.५ टक्क्यांनी अधिक आहेत. सध्यातरी स्पॉट भावाने विकणे योग्य ठरेल.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात ०.६ टक्का वाढून रु. १,४१७ वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स ०.२ टक्का घसरून रु. १,४७४ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ४ टक्के अधिक आहेत.

कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत. सध्याचे भाव हमीभावांपेक्षा कमी आहेत.

मका

NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) गेल्या सप्ताहात रु. २,४०० वर आल्या होत्या, या सप्ताहात त्या घसरून रु. २,३७५ वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स किमतीसुद्धा १.२ टक्क्याने घसरून रु. २,३८८ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स रु. २,४१६ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.७ टक्क्याने अधिक आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) अधिक आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) या सप्ताहात १.१ टक्क्याने वाढून रु. १३,०७४ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती २.६ टक्क्यांनी वाढून रु. १३,१२० वर आल्या आहेत. मे किमती रु. १३.००४ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ०.५ टक्का कमी आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) या सप्ताहात १.३ टक्का वाढून रु. ५,८७५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे. आवक पुढील सप्ताहापासून वाढती राहील.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,००० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. मुगाचा हंगाम आता संपला आहे.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.३ टक्का वाढून रु. ४,२४२ वर आली होती. या सप्ताहात ती ०.६ टक्का घसरून रु. ४,२१७ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे. हमीभावापेक्षा बाजारभाव कमी आहे.

तूर

गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) ३.५ टक्क्यांनी घसरून रु. ७,३२९ वर आली होती. या सप्ताहात ती ४ टक्क्यांनी वाढून रु. ७,६१९ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. आवक कमी होऊ लागली आहे.

कांदा

कांद्याची किंमत (पिंपळगाव बसवंत) या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने घसरून रु. २,४७० वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) घसरून रु. ९०० वर आली होती; या सप्ताहात ती रु. ८९० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT