Papaya Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Market : पपई आवकेत वाढ; दरात सतत घसरण

Papaya Rate : पपईची आवकही मागील चार ते पाच दिवसांत वाढली आहे. मध्यंतरी पपई दरांचा तिढा निर्माण झाला होता.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशातील बेमोसमी पाऊस व मध्यंतरी पईची रखडलेली काढणी यामुळे पपई दरात सतत घसरण होत असून, सध्या कमाल दर आठ रुपये एक पैसा प्रतिकिलो, असा जागेवर किंवा थेट खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहे.

मागील महिन्याच्या सुरुवातीला पपईचे दर ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो, असे जागेवर शेतकऱ्यांना मिळत होते. परंतु महिनाभरात दरात किलोमागे २२ ते २७ रुपयांची घट झाली आहे. पपईची आवकही मागील चार ते पाच दिवसांत वाढली आहे. मध्यंतरी पपई दरांचा तिढा निर्माण झाला होता.

शेतकऱ्यांनी किमान १७ ते १८ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर मिळावा, अशी मागणी केली होती. परंतु शिरपूर (जि. धुळे) बाजार समितीने बैठक घेऊन दराचा तिढा दूर केला व १५ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर दिला जाईल, असा निर्णय झाला. यातच मागील आठ ते १० दिवस सतत ढगाळ, पावसाळी वातावरण, बेमोसमी पाऊस, गारपीट अशी स्थिती खानदेशातील अनेक भागांत होती.

यातच पपईची काढणी प्रतिकूल वातावरणात रखडली. यातच एप्रिल, मेमध्ये लागवडीच्या पपई बागांतही पपई काढणीवर आली. अधिक आवकेचा दबावही बाजारात तयार झाला. याचा लाभ खरेदीदारांनी घेतला व कमी दर सांगण्यास सुरुवात केली. यामुळे दराचा तिढा तयार झाला.

शहादा (जि. नंदुरबार) बाजार समितीने हा तिढा दूर करून आठ रुपये एक पैसे प्रतिकिलोचा दर पपईस नुकताच निश्चित केला. पपईची आवक सध्या खानदेशात प्रतिदिन ७० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी आहे. ही आवक मागील पंधरवड्याच्या सुरुवातीला प्रतिदिन ५५ ट्रक होती. आवकेत मोठी वाढ झाली आहे. पपईस उत्तर भारतात उठाव आहे. परंतु शेतकऱ्यांना सध्या कमी दर मिळत आहेत.

पपईचे दर सुरुवातीला ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो, असे जागेवर शेतकऱ्यांना मिळाले होते. परंतु आता दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. ४० दिवसांत पपईचे दर सतत घसरले आहेत. दर स्थिर न राहिल्याने फारसा नफा नाही. कारण यंदा सुरुवातीला उत्पादन कमी होते. प्रतिकूल वातावरणाचा फटकाही पिकास बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT