Maize Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market : खानदेशात मका आवकेत सतत घट

Maize Rate in Khandesh : खानदेशातील विविध बाजार समित्यांमध्ये मक्याची आवक अल्प किंवा हवी तेवढी नाही.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशातील विविध बाजार समित्यांमध्ये मक्याची आवक अल्प किंवा हवी तेवढी नाही. दर टिकून आहेत. किमान १८०० व कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. नवीन हंगाम किंवा आगाप रब्बी मका पिकाची मळणी सुमारे दीड ते दोन महिन्यानंतर होईल, अशी स्थिती आहे.

मका आवकेत मागील दोन महिन्यांत सतत घट झाली आहे. दरही टिकून आहेत. आता मका पीक खानदेशात बऱ्यापैकी आहे. अनेकांनी ऑक्टोबरमध्ये आगाप पेरणी किंवा लागवड केली आहे. या पिकातून महिनाभरात मळणी सुरू होईल. तसेच नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत मक्याची कमाल लागवड झाली आहे. या पिकातून मळणी होऊन मका आवकेस सुमारे दोन ते अडीच महिने लागतील.

मक्याची लागवड खानदेशात सुमारे ३५ हजार हेक्टरवर झाली आहे. सर्वाधिक सुमारे २५ ते २७ हजार हेक्टर एवढी लागवड जळगाव जिल्ह्यात झाली आहे. यापाठोपाठ धुळे व नंदुरबारात लागवड आहे. सध्या बाजारात मक्याची आवक अल्प किंवा कमी आहे. कारण रब्बी हंगामातील मक्याची मळणी सुरू झालेली नाही. काही शेतकऱ्यांनी खरिपातील मका साठवून ठेवला होता.

खरिपात मक्याचे चांगले उत्पादन हाती आले. यात बऱ्यापैकी दरही मिळाले. किमान १७०० व कमाल २२५० रुपये प्रतिक्विंटलचे दर मक्यास ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये मिळाले. सध्या दर टिकून आहेत. पण आवक कमी आहे. यामुळे या दरांचा लाभ शेतकऱ्यांना फारसा होत नसल्याचे दिसत आहे.

जळगाव जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, जामनेर व जळगाव या बाजार समित्या मक्यासाठी प्रसिद्ध आहेत. या सर्व बाजार समित्यांमध्ये रोज मिळून ५०० ते ६०० क्विंटल एवढी मक्याची आवक होत आहे.

धुळ्यातील दोंडाईचा (ता.शिंदखेडा), शिरपूर, नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा येथील बाजारातही मक्याची आवक कमीच आहे. तेथेही सध्या रोज मिळून ५०० क्विंटल एवढीच आवक दिसत आहे. आवक महिनाभर शेतकऱ्यांकडून होणार नाही. यामुळे दरातही मोठी वाढ किंवा घट होत नसल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT