Nashik Dry Port
Nashik Dry Port Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Nashik Dry Port : निफाड येथे ड्रायपोर्ट उभारणीचा मार्ग मोकळा

टीम ॲग्रोवन

नाशिक : राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट (National Highway Logistic Management) कंपनीबरोबर काम करण्यास ‘जेएनपीटी’ने (JNPT) सहमती दर्शविली आहे. त्यामुळे निफाड येथे ड्रायपोर्ट प्रकल्प (Dry Port Project Nashik) उभारण्याचा निर्णय झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित ड्रायपोर्ट प्रकल्प उभारण्याच्या कामाला गती येणार आहे.

शेतकऱ्यांना शेतीमाल जलद गतीने देश-विदेशांत पोहोचविता यावा, यासाठी ड्रायपोर्ट उभारण्याच्या हालचाली सुरू होत्या. राज्यात खूप आयसीडी (इंटिग्रेटेड कंटेनर डेपो) असल्याने नवीन आयसीडी प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र रेड झोनमध्ये होता. मात्र आता राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीबरोबर काम करण्यास ‘जेएनपीटी’ने सहमती दर्शविल्याने ड्रायपोर्ट प्रकल्प निफाड येथे उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यात भाजीपाल्यासह द्राक्ष, कांदा, डाळिंब आदी शेतीमालाचा समावेश आहे. त्याच्या देश-विदेशांतील विक्रीसाठी प्रयत्न सुरू होते. निफाड साखर कारखान्याची प्रस्तावित जागेवर ड्रायपोर्ट प्रकल्प होणे अवघड वाटत होते. कारण, कारखान्यावर थकीत विविध कर आणि कर्जामुळे अडचणी होत्या. मात्र, खासदार हेमंत गोडसे यांनी पुढाकार घेत हा प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाऊ नये म्हणून शिलापूर आणि मुंडेगाव येथील जागा ड्रायपोर्टसाठी सुचविला होत्या.

दरम्यान, अडचणींवर मार्ग काढण्यासाठी नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट (एनएचएलएम) पुढे सरसावले आहे. मल्टिमॉडेल औद्योगिक पार्कने (एमएमआयपी) ठरविले तर आयसीडी म्हणून ते नाशिकला वगळण्याची परवानगी राज्याकडून मिळवू शकतात. ‘एनएचएलएम’ ही नॅशनल हायवेची कंपनी असून, काही दिवसांपूर्वी या कंपनीने ‘जेएनपीटी’ला पत्र लिहिले. त्यात ‘आपण सोबत काम करून नाशिक येथे ड्रायपोर्ट उभारू या,’ अशी विनंती केली होती. या प्रस्तावास नुकतीच ‘जेएनपीटी’ने सहमती दर्शविली आहे. तशी माहिती शिपिंग मंत्रालयाला

कळविली आहे.

निफाडच्या ड्रायपोर्टबाबत संबंधित मंत्र्यांच्या बैठका घेतल्या. सरकार बदलल्यानंतर दोन वर्षांत संबंधितांनी जागेबाबत कुठलेच स्पष्टीकरण दिलेली नाही. संबंधित मंत्र्यांनी आश्‍वासन दिले आहे. श्रेयवादात न अडकता शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
डॉ. भारती पवार, खासदार
ड्रायपोर्ट प्रस्तावास शिपिंग मंत्रालयाकडून लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग आणि जेएनपीटी हे संयुक्तपणे ड्रायपोर्ट उभा करतील. -
हेमंत गोडसे, खासदार, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT