Chana Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

MSP Chana Procurement : हमीभावाने हरभरा खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता निश्‍चित

Chana Market : यंदा राज्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी विविध एजन्सींच्या केंद्रांवर २७ मार्चपासून ऑनलानइ शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली असून, २५ एप्रिल नोंदणीची अंतिम मुदत आहे.

माणिक रासवे

Parbhani News : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत केंद्रीय नोडल एजन्सी नाफेड (राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ) आणि एनसीसीएफ (राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ) यांच्या वतीने रब्बी हंगाम २०२४-२५ मधील हरभरा हमीभावाने (प्रति क्विंटल ५६५० रुपये) खरेदीसाठी कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार राज्यातील ३२ जिल्ह्यांसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्‍चित करण्यात आली आहे.

यंदा राज्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी विविध एजन्सींच्या केंद्रांवर २७ मार्चपासून ऑनलानइ शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली असून, २५ एप्रिल नोंदणीची अंतिम मुदत आहे.

कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार राज्यातील ३२ जिल्ह्यांतील उत्पादनापैकी २०.०४ टक्के हरभरा हमीभावाने खरेदीचे उद्दिष्ट केंद्र शासनाने मंजूर केले आहे, असे पणन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

हरभरा जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता (क्विंटलमध्ये)

जिल्हा....उत्पादकता

छत्रपती संभाजीनगर...९.००

जालना....१५.२०

परभणी...१०.००

हिंगोली...१२.५०

नांदेड...१६.००

लातूर...१२.९०

धाराशिव....१२.००

बीड...११.००

नाशिक...८.५०

धुळे...१४.७५...

नंदुरबार...९.९४

जळगाव...१४.००

अहिल्यानगर...१०.००

पुणे...९.००

सोलापूर...८.४६

सातारा...११.५०

सांगली...१२.६२

कोल्हापूर...१२.५०

बुलडाणा...११.४०

अकोला...११.५०

वाशीम...१५.५०

अमरावती...१८.००

यवतमाळ...१२.५०

वर्धा...१२.५०

नागपूर...१६.००

भंडारा....९.८०

गोंदिया...८.४२

चंद्रपूर...१२.५०

गडचिरोली...४.७५

ठाणे...७.७५

पालघर...६.७५

रायगड...७.३२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

Water Management: आधुनिक तंत्रज्ञानाने जल व्यवस्थापनातील समस्येची उकल शक्य

El Nino Impact Agriculture: यंदा एल निनोचे सावट; भूजल पुर्भरण गरजेचे!

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

SCROLL FOR NEXT