Chana Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Market : हरभऱ्याचे दर ऐन दिवाळीत स्थिरावले

Team Agrowon

Pune News : हरभऱ्याच्या भावात मागील महिनाभरापर्यंत चांगली वाढ झाली होती. पण दिवाळीत हरभरा, बेसन आणि डाळीला मागणी असूनही भाव स्थिरावले आहेत. तर काही बाजारात भावात काहीशी नरमाई देखील आली. हरभरा भाव सध्या ५ हजार ५०० ते ६ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

दिवाळीच्या काळात बेसन आणि हरभरा डाळीला चांगला उठाव असतो. दिवाळीत प्रक्रिया उद्योगांकडूनही हरभरा डाळीला मागणी असते. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या काळात हरभऱ्याचे भाव काहीसे वाढलेले असतात.

यंदाही हरभरा डाळीला मागील काही आठवड्यांपासून चांगलीच मागणी वाढली. पण दिवाळीचा सण जवळ आल्यानंतर हरभरा, हरभरा डाळ आणि बेसनाचे भाव स्थिरावले. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला. तर काही बाजारात दरात सुधारणा झाली. पण ही सुधारणा अपेक्षेप्रमाणे नव्हती.

ऐन दिवाळीत हरभऱ्याचे भाव स्थिर राहण्यामागे मुख्य कारण आहे नाफेडची विक्री. देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. तसेच पुढील सहा महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होतील. या काळात ग्राहकांची नाराजी नको म्हणून सरकार दिवाळीत भाव वाढू देत नाही.

हरभऱ्याचे भाव वाढत असल्याने सरकारने दिवाळीत नाफेडच्या स्टॉकमधील माल विक्रीचा निर्णय घेतला. ‘नाफेड’ने मागील काही दिवसांमध्ये हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली. त्यामुळे हरभरा भावावर दबाव येऊन भाव स्थिरावले.

सध्या देशातील बाजारात हरभऱ्याला ५ हजार ५०० ते ६ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर मोठ्या ग्राहक बाजारांमध्ये भावपातळी यापेक्षा काही प्रमाणात वाढली. हरभरा डाळीचे भावही ८५ ते ९५ रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान आहेत.

बेसनही वेगवेगळ्या बाजारात १२० ते १३० रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान आहेत. दिवाळीच्या काळात बेसनचे भाव स्थिर राहावे, यासाठीही सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. अवास्तव भावाने विक्री करू नये, अशी तंबीही सरकारने व्यापाऱ्यांना दिली आहे.

उत्पादन घटण्याची शक्यता

रब्बीतील हरभरा लागवड सुरु झाली आहे. पण यंदा रब्बीवर दुष्काळाचे सावट आहे. यामुळे हरभरा लागवड गेल्यावर्षीपेक्षा कमी वेगाने सुरू झाली. देशात आतापर्यंत २६ लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली. मागील हंगामात याच काळात हरभऱ्याखाली जेवढे क्षेत्र होते, त्याच्या तुलनेत यंदाची लागवड दोन टक्क्यांनी कमी आहे.

यंदा हरभरा लागवड कमीच राहण्याचा अंदाज आहे. तसेच हरभरा पिकाला पाणी टंचाई भासण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे यंदा हरभरा उत्पादनात घट येऊ शकते. याचा आधार हरभरा बाजाराला मिळू शकतो, असाही अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT