Agriculture  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Rabi Sowing : रब्बीत हरभऱ्याची पेरणी आघाडीवर; मक्याचे क्षेत्रही काही जिल्ह्यांमध्ये वाढीचा कल

Crop Cultivation Expansion : राज्यात रब्बीचा पेरा २८ नोव्हेंबरपर्यंत सरासरीच्या ६५ टक्के पेरा पुर्ण झाला. ३५ लाख २१ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. मागील हंगामात याच काळात जवळपास २४ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात रब्बीचा पेरा २८ नोव्हेंबरपर्यंत सरासरीच्या ६५ टक्के पेरा पुर्ण झाला. ३५ लाख २१ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. मागील हंगामात याच काळात जवळपास २४ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यात हरभऱ्याचा पेरा ७९ टक्के, मका ६९ टक्के आणि गव्हाची पेरणी ४२ टक्के पूर्ण झाली. 

राज्याचे रब्बीत सरासरी पेरणी क्षेत्र जवळपास ५४ लाख हेक्टर आहे. यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र सर्वात जास्त २१ लाख ५२ हजार हेक्टर आहे. त्यानंतर ज्वारी १७ लाख ५३ हजार हेक्टर, गहू १० लाख ४८ हजार हेक्टर आणि मका २ लाख ५८ हजार हेक्टरवर सरासरी क्षेत्र आहे.  

राज्याच्या एकूण रब्बीच्या सरासरी क्षेत्रापैकी आतापर्यंत ३५ लाख हेक्टरवर म्हणजेच ६५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. तर गव्हाची पेरणी काहिशी धिम्या गतीने सुरु असल्याचे दिसते. हरभऱ्याच्या पेरणीच्या मात्र आघाडी घेतली आहे. सरासरी क्षेत्राच्या तब्बल ७९ टक्के लागवड पूर्ण झाली.

आतापर्यंत १७ लाख १० हजार हेक्टरवर हरभरा लागवड झाली. ज्वारीचा पेरा ६४ टक्के पूर्ण झाला. ज्वारीखाली आतापर्यंत ११ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र आले आहे. गव्हाचा पेरा ४ लाख ४२ हजार हेक्टरवर झाला. सरासरीच्या तुलनेत केवळ ४२ टक्के गव्हाची पेरणी पूर्ण झाली. तर मक्याचा पेरा ६९ टक्के पूर्ण झाला असून मक्याखाली आतापर्यंत १ लाख ७८ हजार क्षेत्र आले. 

लातूर विभागात  हरभरा वाढला

लातूर विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात हरभरा पेरणीने चांगलाच वेग घेतला. लातूर विभागात हरभऱ्यांचे सरासरी क्षेत्र ७ लाख ८६ हजार हेक्टर आहे. पण आतापर्यंत ८ लाख हेक्टरवर पेरा झाला.

म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या १०२ टक्के पेरा झाला. लातूर जिल्ह्यात सरासरीच्या १०४ टक्के, नांदेड जिल्ह्यात ११५ टक्के आणि हिंगोली जिल्ह्यात १०६ टक्के पेरा झाला. लातूर विभाग वगळता वाशिम जिल्ह्यातही सरासरीच्या ११८ टक्के, बीड जिल्ह्यात ११२ टक्के पेरणी झाली. 

पुणे विभागात  मका वाढतोय

मक्याला चांगला भाव मिळत असल्याने मक्याचे क्षेत्र वाढीचा अंदाज होता. राज्यात नाशिक विभाग मक्याचे आगार म्हणून ओळखला जातो. मात्र पुणे विभागात आतापर्यंत मक्याची लागवड सरासरीच्या तुलनेत ११७ टक्के झाली.

पुणे जिल्ह्यात सरासरी क्षेत्र १ लाख ६९ हजार हेक्टर असताना आतापर्यंत २ लाख ३२ हजार हेक्टर म्हणजेच १३७ टक्के पेरा झाला. नगर जिल्ह्यातही सरासरीच्या १२७ टक्के आणि सोलापूर जिल्ह्यात १०४ टक्के पेरा झाला. नाशिक विभागात मात्र मक्याची लागवड पिछाडीवर असून आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत केवळ २५ टक्के लागवड झाली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT