Chana Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Rate : हरभऱ्याला चांगला उठाव

Chana Market Rate : हरभऱ्याला सणांमुळे चांगला उठाव आहे. पण दरात चढ-उतारही दिसत आहेत. देशातील बाजारात हरभरा भाव मागील तीन दिवसांपासून काहीसे नरमले आहेत.

Team Agrowon

Pune News : हरभऱ्याला सणांमुळे चांगला उठाव आहे. पण दरात चढ-उतारही दिसत आहेत. देशातील बाजारात हरभरा भाव मागील तीन दिवसांपासून काहीसे नरमले आहेत. वाढलेल्या भावात सुरु झालेली नफावसुली, कमी झालेला उठाव आणि नाफेडच्या विक्रीचा हरभरा भावावर दबाव दिसतो. सध्या हरभऱ्याला ६ हजार ते ६ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

मागील तीन दिवसांपासून हरभरा दरात क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची नरमाई दिसून आली. दिल्लीमध्ये जी २० परिषद सुरु असल्याने मालवाहू ट्रक्सना प्रवेश नाही. याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. तसेच हरभरा दरात वाढ झाल्यानंतर वाढलेल्या दरात हरभऱ्याला काहीशी मागणी कमी झाली. तसेच ‘नाफेड’ची विक्रीही सुरु झाली. परिणामी हरभरा भावावर काहीसा दबाव आला आहे.

सरकारने चालू हंगामातील देशातील हरभरा उत्पादन विक्रमी १३६ लाख टनांवर पोचल्याचा अंदाज जाहीर केला होता. तसेच मागील हंगामातील २० ते २५ लाख टनांचा शिल्लक स्टॉक होता. म्हणजेच देशात हरभऱ्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात राहिला. तसेच यंदाच्या हंगामात ‘नाफेड’कडे मोठ्या प्रमाणात म्हणजेच ३८ लाख टनांच्या जवळपास स्टॉक होता.

नाफेडने चालू हंगामात २३ लाख ५० हजार टनांची खरेदी केली होती. तर मागील हंगामातील १४ लाख टनांचा स्टॉक नाफेडकडे होता. त्यामुळे बाजारावर मोठा दबाव होता. जूनपर्यंत शेतकऱ्यांना हरभरा हमीभावापेक्षा कमी भावात विकावा लागला. सरकारने हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार ३०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला. मात्र बाजारात शेतकऱ्यांना ५ हजारांच्या पुढे भाव मिळाला नाही. बहुतांशी शेतकऱ्यांना आपला हरभरा ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपयांदरम्यान विकावा लागला.

हरभरा भावात तेजी आली ते ऑगस्टपासून. जुलैपासून सणांसाठी हरभऱ्याला मागणी वाढू लागते. ऑगस्टमध्येही मागणी चांगली राहिली. पण पावसाने राज्यातच नाही तर देशात मोठी दडी मारली. सप्टेंबरमध्ये पाऊस कमीच राहण्याचा अंदाज आहे. म्हणजेच यंदा रब्बीसाठी पिकांना पाण्याची मोठी टंचाई भासण्याची शक्यता आहे. यामुळे हरभरा दराला मोठा आधार मिळाला.

दर टिकून राहण्याचा अंदाज

देशातील अनेक बाजारांमध्ये हरभरा भाव ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांवर पोचले होते. पण मागील काही दिवसांपासून या वाढलेल्या भावात हरभऱ्याला उठाव कमी झाला. तसेच या भावात काहीशी नफावसुलीही सुरु झाली. परिणामी हरभऱ्याचे भाव क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांनी नरमले. त्यातच नाफेडनेही स्टॉकमधील हरभरा विकण्यास सुरुवात केली. यामुळे दरात चढ-उतार दिसून येत आहे. यापुढील काळात हरभऱ्याला चांगला उठाव राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT