Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : चाकुराच्या बाजारात वाढली तुरीची आवक

Tur Rate : हमी भावाने सोयाबीन खरेदीला शासनाकडून ब्रेक मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी तुरीच्या विक्रीसाठी धावपळ सुरु केली आहे.

Team Agrowon

Latur News : हमी भावाने सोयाबीन खरेदीला शासनाकडून ब्रेक मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी तुरीच्या विक्रीसाठी धावपळ सुरु केली आहे. तुरीला हमी भावापेक्षा बाजारपेठेत जादा दर मिळत असल्यामुळे चाकूर येथील बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढली असून प्रतिक्विंटल आठ हजार रुपये पर्यंत भाव मिळत आहे.

शासनाकडून हमी भावाने सोयाबीनची खरेदी केली जात होता, बाजारपेठेत सोयाबीनचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हमी भावात विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. हमी भावाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन येवू लागल्यानंतर शासनाकडून बारदान्याचा तुटवडा करण्यात आला यामुळे पंधरा दिवसापासून खरेदी बंद झाली आहे.

बारदान्याची टंचाई करून शासनाने सोयबीन खरेदीला ब्रेक दिल्याची चर्चा शेतकऱ्यामध्ये आहे. हीच परिस्थिती तुरीच्या बाबतीत होऊ शकते यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये तुरीची विक्री करण्यास सुरवात केली आहे.

शासनाकडून तुरीसाठी ७५५० रुपये हमी भाव जाहीर करण्यात आला आहे तर बाजारात ७ हजार पाचशे ते आठ हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे. चालू हंगामात चांगला पाऊस झाल्यामुळे तुरीचे उत्पादन वाढले आहे.

तुरीचे आणखीन भाव वाढण्याची शक्यता खरेदीदारांकडून वर्तवली जात असली तरी हमी भावापेक्षा जादा दर बाजारपेठेत मिळत असल्यामुळे शेतकरी तुरीची विक्री करून मोकळे होत आहेत. बाजार समितीमध्ये दहा दिवसात तालुक्यातील २५६ शेतकऱ्यांनी ६६० क्विंटल तुरीची विक्री केली आहे,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT