CCI Cotton Procurement  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

CCI Cotton Procurement : ‘सीसीआय’ची कापूस खरेदी पुन्हा बंद

Cotton Market : सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असल्याचे कारण देत भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला ब्रेक लावला. याच आठवड्याच्या सुरुवातीला केंद्र पुन्हा सुरू झाल्याचे जाहीर केले.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असल्याचे कारण देत भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला ब्रेक लावला. याच आठवड्याच्या सुरुवातीला केंद्र पुन्हा सुरू झाल्याचे जाहीर केले. मात्र, पाच दिवसांत केंद्र पुन्हा बंद पडली आहेत. यासाठी काही ठिकाणी सर्व्हरचे कारण पुढे केले तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना ‘ओटीपी’ जात नसल्याचे कारण पुढे केले आहे.

केंद्र शासनाने यंदा कापसाला ७ हजार ५२१ रुपयांचा हमीभाव जाहीर केला. बाजारात कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कल ‘सीसीआय’च्या केंद्राकडे जास्त आहे. जिल्ह्यात सीसीआयने कापूस खरेदीसाठी १५ केंद्र निश्‍चित केले होते. केंद्रावर शेतकऱ्यांचा कापूसही मोठ्या प्रमाणात आणला गेला.

जवळपास १५ लाख क्विंटलची खरेदी या केंद्रावर झाली आहे. मात्र, तांत्रिक कारण पुढे करीत सीसीआयचे खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते. अजूनही शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे. केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. शेतकऱ्यांचा रोष पाहता २४ फेब्रुवारीला सीसीआयचे केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले. या वेळी तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्याचे सांगण्यात आले.

मात्र, चार दिवसांतच सीसीआयचे कापसू खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. या वेळी तांत्रिक कारण पुढे केले जात आहे. यवतमाळ केंद्रावर ३ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत खरेदी बंद ठेवण्याची सूचना प्रसिद्ध केली आहे. सर्व्हर डाऊन असल्याने शेतकऱ्यांना ओटीपी जास्त नसल्याचेही या सूचनेत नमूद आहे.

असेच तांत्रिक कारणे अनेक ठिकाणी पुढे केली जात आहे. मात्र, काही ठिकाणी सरकी उठली गेली नसल्याने केंद्रावरील खरेदी बंद करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी फरदळीचा कापूस येईल, अशी भीती व्यक्त होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारण कोणतेही असली तरी शेतकऱ्यांना गरज आहे त्या काळात खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

यवतमाळ केंद्रांची सूचना

‘सीसीआय’मार्फत कापूस खरेदी ३ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. ‘सीसीआय’च्या पत्रानुसार १५ मार्चपर्यंत ऑनलाइन नोंदणीचे पत्र असले तरी त्यांचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना ओटीपी जात नाही. ऑनलाइन नोंदणीसुद्धा होणार नसल्याचे सूचनेत नमूद आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr. Anand Nadkarni : मनाला दिलासा देणारा आवाज हरपला; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे दुःखद निधन

Social Initiatives: सामाजिक कामांतही हवा कार्यक्षमतेचा, परताव्याचा विचार

Gender Equality: लैंगिक समानतेसाठी धोरणात्मक बदल अपरिहार्य

Non MSP Recommendations: बिगर हमीभाव शिफारशींचे काय ?

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT