Cashewnut Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashewnut Market : उत्पादन कमी तरीही काजू बीच्या दरात घट

धुक्यामुळे तर मोहोर अक्षरशः काळवंडला. त्यामुळे या वर्षी फेब्रुवारी संपत आला तरी अपेक्षित काजू बी बाजारपेठेत आलेली नाही.

Team Agrowon

Cashewnut Market सिंधुदुर्गनगरी / काजू बीच्या दरात (Cashewnut Rate) प्रतिकिलो ५ ते ६ रुपयांनी दरात घसरण झाली आहे. उत्पादन (Cashewnut Production) कमी असल्यामुळे बागायतदारांना दरात वाढ होईल, अशी अपेक्षा होती; परंतु प्रत्यक्षात दरात घसरण झाल्यामुळे बागायतदारांमध्ये (Cashew Producer) अस्वस्थता आहे.

या वर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस, त्यानंतर सतत ढगाळ वातावरण, वादळी वाऱ्यामुळे झालेले नुकसान, प्रचंड धुके आणि ३९ अशांपेक्षा वाढलेले तापमान याचा एकंदर परिणाम या वर्षी काजू उत्पादनावर झाला आहे. धुक्यामुळे तर मोहोर अक्षरशः काळवंडला.

त्यामुळे या वर्षी फेब्रुवारी संपत आला तरी अपेक्षित काजू बी बाजारपेठेत आलेली नाही. काही प्रमाणात काजू गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून जिल्ह्यात दिसत आहे. काजू हंगामाच्या सुरुवातीला या वर्षी प्रतिकिलो १२० ते १२५ रुपये दराने व्यापाऱ्यांनी काजू बी खरेदी करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर त्यामध्ये काहीशी सुधारणा होऊन दर १३० रुपयांपर्यंत पोहोचले होते. परंतु या आवठड्यपासून दरात पुन्हा घसरण झाली आहे. लहान आकाराची काजू बी ११८, तर मोठ्या आकाराची काजू बी १२२ ते १२५ रुपयांनी खरेदी केली जात आहे.

ज्या वेळी उत्पादन कमी असते त्या वेळी दरात वाढ होते, असे सर्वसाधारण गणित मांडले जाते. परंतु या वर्षी काजूच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असताना देखील काजू बीच्या दरात घसरण होत असल्याने बागायतदारांत अस्वस्थता पसरली आहे.

काजू बीला प्रतिकिलो १२२ रुपये उत्पादन खर्च येतो. त्यामुळे साधारणपणे १४० रुपये प्रतिकिलो कमीत कमी मिळणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात उत्पादन खर्चाइतकाही दर बागायतदाराला मिळत नाही.

त्यामुळे काजूचे उत्पादन घ्यावे की नको, अशा विचारात आम्ही आहोत. शासनदेखील हमीभाव किवा सपोर्ट प्राइजचा विचार करीत नाही ही आमच्या दृष्टीने शोकांतिका आहे.

- संदेश देसाई, काजू बागायतदार, कळणे, ता. दोडामार्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT