Cashew Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Rate: काजू बीला किलोला १६० रुपये दर

Market Update: यंदा हंगामाच्या सुरुवातीला राजापूर तालुक्यात काजू बीला किलोला १६० रुपये दर मिळाला आहे. हा दर शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. त्यामध्ये पुढील काही दिवसांत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राजेश कळंबटे

Ratnagiri News: यंदा हंगामाच्या सुरुवातीला राजापूर तालुक्यात काजू बीला किलोला १६० रुपये दर मिळाला आहे. हा दर शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. त्यामध्ये पुढील काही दिवसांत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यंदा सुरुवातीलाच अपेक्षित उत्पादन नसल्यामुळे दर वाढत राहतील अशी शक्यता आहे.

या वर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून काजू उत्पादनाला पोषक वातावरण नव्हते. लांबलेला पाऊस, नोव्हेंबर महिन्यात अधूनमधून निर्माण झालेले ढगाळ वातावरण, डिसेंबर महिन्यात दाट धुके यामुळे काजूचा मोहर काळवंडला होतो. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातील काजू बीमध्ये घट झाली आहे. गेले काही दिवस तापमान वाढलेले आहे.

त्याचा काजू बीवर परिणाम होत असल्याचे बागायतदारांचे मत आहे. उत्पादन कमी राहिले तर अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही अशीच भीती बागायतदारांमध्ये आहे. काही शेतकऱ्यांच्या बागांमधील सुकी काजू बीच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. कमी उत्पादन असल्यामुळे किलोला १६० रुपये दर मिळाला आहे.

गतवर्षी हंगामाच्या सुरुवातीला १२० ते १२५ रुपये दर मिळालेला होता. त्यामध्ये काजू बीचा आकार लहान राहिल्यामुळे ११० रुपयांपर्यंत खाली आला. भविष्यात या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हंगामाबाबत बागायतदार गणेश शिंदे म्हणाले, ‘‘काजू उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी मशागत आणि औषध फवारण्या करतात. त्या कामांवर थोडाफार खर्च केला जातो.

अपेक्षित उत्पादन किंवा दर मिळाला नाही, तर हा खर्च वाया जातो. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला मिळालेला दर ही समाधानकारक बाब आहे. अखेरच्या टप्प्यात दर चांगला राहील अशी अपेक्षा आहे.’’

चिपळूण तालुक्यात चांगला दर

चिपळूण तालुक्यात ओल्या काजू गराला चांगला दर मिळत आहे. प्रतिकिलो १ हजार ४०० रुपये, तर कच्च्या बीसाठी शेकडा दोनशे रुपये दर आहे. ओल्या बीसाठीचा दर बागायतदारांसाठी समाधानकारक ठरला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT