Onion Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Export Duty : कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करा

Onion Market Update : प्रति क्विंटल ३,००० रुपयांपर्यंत विकला जाणारा कांदा २,००० हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. रब्बी उन्हाळ कांद्याचे लागवडीखालील क्षेत्र वाढले असून यंदा कांद्याचे पीक चांगले असल्याने उत्पादनात ३० टक्के वाढ शक्य आहे.

Team Agrowon

Nashik News : प्रति क्विंटल ३,००० रुपयांपर्यंत विकला जाणारा कांदा २,००० हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. रब्बी उन्हाळ कांद्याचे लागवडीखालील क्षेत्र वाढले असून यंदा कांद्याचे पीक चांगले असल्याने उत्पादनात ३० टक्के वाढ शक्य आहे.

आगामी काळात कांदा दरात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क लादले आहे, ते शून्य टक्के केले पाहिजे. यासह कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, अन्यथा आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

शेती संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शेट्टी यांची शिरोळ (जि. कोल्हापूर) येथे भेट घेतली. या वेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे-पाटील, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस सुधाकर मोगल, निफाड तालुकाध्यक्ष गजानन घोटेकर, सिन्नर तालुकाध्यक्ष आत्माराम पगार आदी उपस्थित होते.

याबाबत शेट्टी म्हणाले, की तहान लागल्यानंतर विहीर खोदण्यापेक्षा कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना केली पाहिजे. भाव पडल्यानंतर ‘नाफेड’च्या माध्यमातून कांदा खरेदीला उतरायचे आणि ठराविक दलाल यांचाच कांदा खरेदी करायचा, हे धंदे सरकारने बंद करावे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर सरकारने कांदा निर्यात शुल्क तातडीने रद्द करावे, अशी मागणी केली.

...तर कृषिमंत्री कोकाटे यांच्या दारात बसू

राज्यात कांदा लागवडी वाढल्या असून ३० टक्के उत्पादन वाढण्याची शक्यता आहे, ही बाब राज्य सरकारच्या वतीने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्र सरकारच्या लक्षात आणून द्यावी. मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांची भिकाऱ्यांशी तुलना करत बसण्यापेक्षा कांदा निर्यात वाढ व निर्यात शुल्क शून्य होईल यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा. अन्यथा कांद्याचे दर पडल्यास शेतकरी कृषिमंत्र्यांच्या दारात येऊन बसतील, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT