Red Chili Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Red Chili Market : लाल मिरची बाजारात यंदा मोठी उलाढाल

Chili Rate : यंदा जिल्ह्यातील मिरची उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे लाल मिरचीचे दर टिकून आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Dhule News : यंदा जिल्ह्यातील मिरची उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे लाल मिरचीचे दर टिकून आहेत. मिरची उत्पादनात आघाडीवर असलेल्या नंदुरबार, धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा) आणि धुळ्यातही उलाढाल बरी आहे.

खानदेशात धुळे जिल्ह्यातील धुळे, दोंडाईचा (ता. शिंदखेडा) व नंदुरबारमध्ये लाल, ओल्या मिरचीची आतापर्यंत सुमारे ५५ कोटींहून अधिक रकमेची उलाढाल झाली आहे. तुलनेत धुळे बाजार समितीत वाळविलेल्या लाल मिरचीने २४ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर पार मध्यंतरी ओलांडला होता. ओल्या, हायब्रीड, पांडी प्रजातीच्या मिरचीची आवक घटल्याने उत्पादकांना ९०० ते १६ हजारांपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळतो आहे.

डिसेंबर ते फेब्रुवारी असा लाल मिरचीचा हंगाम असतो. त्यानुसार बाजारात मिरचीची आवक सुरू झाली आहे. ग्रामीण भागासह लगतच्या शहरातील शेतकरी मिरची विक्रीसाठी आणत आहेत.

मागील वर्षी गारपीट व कमी पाऊस झाल्याने मिरचीचे सरासरी उत्पादन घटले आहे. त्यामुळे स्थानिक मिरचीला उच्चांकी भाव मिळत आहे. हायब्रीड मिरचीचा दर दर्जानुसार निश्‍चित होत आहे. ओल्या लाल मिरचीचे दर एक हजार ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल असे आहे.

धुळे, नंदुरबार, दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील बाजारात सध्या रोज वाळविलेल्या लाल मिरचीची एक हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. कमाल २४ हजार १००, किमान एक हजार व सरासरी १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर उत्पादकांना मिळत आहे.

ओल्या लाल मिरचीची आवक कमी

ओल्या लाल मिरचीची आवक कमी झाली आहे. कारण अनेकांचे मिरची पीक खराब झाले आहे. त्याची उत्पादनक्षमता कमी झाल्याने पीक काढून क्षेत्र रिकामे करण्यात आले आहे. नंदुरबारात ओल्या लाल मिरचीची आवक अधिक होते. त्यास किमान एक हजार, सर्वाधिक ७ हजार ५६ आणि सर्वसाधारण ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मागील सहा ते सात दिवसांत राहिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Account Verification: शेतकऱ्यांच्या खात्यांची कर्जमाफीसाठी तपासणी

Monsoon In Kerala: आनंदघन केरळात

Onion Procurement Rules: कांदा खरेदीचे निकष शिथिल

Vidarbha Rain Forecast: विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Dahivadi Heavy Rain: दहिवडी परिसराला पावसाने झोडपले

SCROLL FOR NEXT